मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care Tips: ‘या’ ५ चुका तुमच्या केसांना बनवू शकतात मुळापासून निर्जीव! तुम्हीही करत नाही ना? वाचा...

Hair Care Tips: ‘या’ ५ चुका तुमच्या केसांना बनवू शकतात मुळापासून निर्जीव! तुम्हीही करत नाही ना? वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 10, 2024 12:09 PM IST

Hair Care Tips: उन्हाळ्यात केस केवळ चिकट आणि कोरडेच होत नाहीत, तर काही चुकांमुळे केस गळणे आणि केसांना फाटे फुटण्याची समस्याही वाढते.

‘या’ ५ चुका तुमच्या केसांना बनवू शकतात मुळापासून निर्जीव!
‘या’ ५ चुका तुमच्या केसांना बनवू शकतात मुळापासून निर्जीव! (unsplash)

Hair Care Tips: चमकदार आणि निरोगी केस सौंदर्यात भर घालतात, तर कोरडे आणि निर्जीव केस खूप वाईट दिसतात. प्रदूषण, केसांची काळजी घेताना होणाऱ्या चुका, पोषणाचा अभाव, हार्मोनल असंतुलन अशी अनेक कारणे आहेत, ज्यामुळे बहुतेक लोक केस गळण्याच्या समस्येने त्रस्त होतात. उन्हाळ्यात कोरड्या आणि निर्जीव केसांची समस्या अनेक लोकांना सतावते. यामागे तुमच्या दैनंदिन जीवनातील काही चुका असू शकतात. उन्हाळ्यात केस केवळ चिकट आणि कोरडेच होत नाहीत, तर काही चुकांमुळे केस गळणे आणि केसांना फाटे फुटण्याची समस्याही वाढते. 

ट्रेंडिंग न्यूज

काही गोष्टींकडे विशेष लक्ष न ठेवल्यास टाळूवर बुरशीजन्य संसर्ग होण्याचा धोका असतो, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. चला तर मग जाणून घेऊया उन्हाळ्यात केसांची काळजी घेताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

Visa-Free Countries: व्हिसा न घेताही ‘या’ देशांमध्ये बिनधास्त फिरू शकतात भारतीय! पाहा कोणते आहेत हे देश...

कडक उन्हात केस न झाकणे 

उन्हाळ्यात कडक सूर्यप्रकाश केवळ त्वचेसाठीच नाही, तर केसांनाही नुकसान पोहोचवतो. जर, तुम्ही तुमचे केस न झाकता कडक उन्हात बाहेर गेलात, तर यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते आणि तुमच्या केसांची चमक देखील कमी होऊ शकते.

खूप कमी किंवा खूप जास्त शॅम्पू वापरणे

उन्हाळ्यात घामामुळे टाळूवर बॅक्टेरिया झपाट्याने वाढतात, त्यामुळे केस गळणे आदी समस्या उद्भवू लागतात. जर तुम्ही तुमचे केस कमी शॅम्पूने धुतले तर त्यामुळे केसांची समस्या देखील निर्माण होऊ शकते. त्याचबरोबर केसांना वारंवार शॅम्पू लावला ते कोरडेपणाही वाढू शकतो.

केसांना तेल न लावणे

उन्हाळ्यात केसांना तेल लावण्याची गरज नाही असे लोकांना वाटते. पण, त्यामुळे तुमचे केस हळूहळू कोरडे होऊ लागतात, त्यामुळे केस धुण्यापूर्वी काही वेळ आधी तेल आवश्य लावावे. मात्र, केसांना रात्रभर तेल लावून ठेवू नये.

Mothers Day 2024 Gift Ideas: ‘मदर्स डे’ला तुमच्या आईला द्या ‘या’ ५ अनोख्या गोष्टी भेट; दिवस होईल खास!

पोहताना टोपी न घालणे

बरेच लोक उन्हाळ्यात पोहायला जातात. या काळात केसांचे संरक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा केस गळणे, केस निर्जीव होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. पोहताना केसांना टोपी घालावी. आणि पाण्यातून बाहेर पडल्यानंतर लगेच साध्या पाण्याने केस धुवावे.

केस नेहमी मोकळे सोडणे

उन्हाळ्यात तुमचे केस मोकळे ठेवल्याने तुम्हाला खूप त्रास होतो. कारण, त्यामुळे जास्त घाम येतो. त्याच वेळी, जास्त घामामुळे, केस अधिकाधिक चिकट होतात आणि जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा सहजपणे टाळूवर धूळ जमा होते. त्याच वेळी, मोकळे केस लगेच गुंततात, ज्यामुळे विंचरताना जास्त केस तुटतात. प्रत्येक आठवड्यात हेअर मास्क, शॅम्पूपूर्वी तेल लावणे, ६ आठवड्यात एकदा केस ट्रिम करणे, सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कापासून केसांचे संरक्षण करणे यासारख्या छोट्या टिप्स फॉलो केल्यास उन्हाळ्यात केसांच्या समस्यांपासून तुम्ही दूर राहू शकता.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel