मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Coconut For Hair: केसांच्या सर्व समस्या सोडवू शकतो नारळ, असा करा वापर

Coconut For Hair: केसांच्या सर्व समस्या सोडवू शकतो नारळ, असा करा वापर

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 19, 2024 11:17 AM IST

Hair Care With Coconut: नारळाचे दूध खूप आरोग्यदायी मानले जाते. हे आपल्या आरोग्यासोबतच केसांच्या पोषणासाठीही चांगले मानले जाते. नारळाचे दूध केसांसाठी कसे वापरावे ते जाणून घ्या.

केसांसाठी नारळाचे दूध वापरण्याची पद्धत
केसांसाठी नारळाचे दूध वापरण्याची पद्धत

Ways to Use Coconut Milk for Hair Care: आरोग्यासाठी नारळ अतिशय फायदेशीर असते. पण तुम्हाला माहीत आहे का की फक्त शरीरासाठीच नाही तर नारळ तुमच्या केसांसाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे.जर घरी नारळ असेल तर तुम्ही तुमच्या केसांच्या अनेक समस्या त्याच्या मदतीने सोडवू शकता. खरं तर नारळाच्या मदतीने तुम्ही घरी दूध बनवू शकता आणि नंतर हे दूध केसांना लावू शकता. येथे काही वेगळ्या पद्धती आहेत ज्या तुम्ही सहज फॉलो करू शकता. या पद्धतींनी केसांच्या विविध समस्यांपासून आराम मिळेल. जाणून घ्या केसांच्या समस्या सोडवण्यासाठी नारळाचे दूध कसे वापरावे.

या प्रकारे वापरा नारळाचे दूध -

१. केसांच्या वाढीसाठी तुम्ही नारळाचे दूध वापरू शकता. यासाठी नारळाच्या दुधात एलोवेरा जेल मिक्स करा. हे चांगले मिसळल्यानंतर टाळूवर लावा. नारळाच्या दुधात व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. अशा परिस्थितीत ते केसांचे पोषण करते आणि वाढीस चालना देते.

२. रफ, फ्रिजी केसांवरही तुम्ही नारळाचे दूध वापरू शकता. नारळाचे दूध होम कंडिशनरसारखे काम करते. यासाठी दूध घेऊन केसांना लावा आणि काही वेळ राहू द्या. त्यात काही जैविक घटक असतात जे तुमच्या खराब झालेल्या केसांना ओलावा देतात. त्याच्या वापराने स्प्लिट एन्ड्समध्ये ब्रेकेज होत नाही.

३. केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी तुम्ही नारळाच्या दुधाचा मास्क बनवू शकता. यासाठी नारळाच्या दुधात मध मिक्स करा. नंतर कोरड्या केसांवर लावा. हा मास्क केसांना अर्धा तास लावा आणि नंतर धुवा. याच्या वापराने केसांचा कोरडेपणा कमी होऊ लागतो.

४. तुमचे केस खूप गळत असतील तर तुम्ही नारळाचे दूध वापरू शकता. यासाठी केस धुतल्यानंतर नारळाच्या दुधाने केस धुवा आणि नंतर साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. या दुधाच्या मदतीने कमकुवत मुळांना पोषण मिळते.जे केस गळणे थांबवण्यास मदत करते.

५. केसांमध्ये खूप कोंडा होत असल्यास नारळाच्या दुधात लिंबाचा रस मिसळून लावा. हे मिश्रण केसांना काही वेळ लावून ठेवा आणि नंतर केस धुवा. हे लावल्याने ऑइली केसांपासूनही सुटका मिळेल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग