Hair Care Tips: केसांची हरवलेली चमक परत देईल किचन मधील 'हा' मसाला! असा करा याचा वापर-hair care tips know how to use star anise to get shiny beautiful hair ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care Tips: केसांची हरवलेली चमक परत देईल किचन मधील 'हा' मसाला! असा करा याचा वापर

Hair Care Tips: केसांची हरवलेली चमक परत देईल किचन मधील 'हा' मसाला! असा करा याचा वापर

Sep 15, 2024 11:19 AM IST

Shiny Beautiful Hair: चक्रफूलमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे टाळूचे आरोग्य सुधारून केसांची स्थिती सुधारतात, असे मानले जाते. चांगल्या हेअर केअरसाठी चक्रफूल कसे वापरावे ते जाणून घ्या.

hair care tips: केसांसाठी चक्रफूल वापरण्याची पद्धत
hair care tips: केसांसाठी चक्रफूल वापरण्याची पद्धत

How to Use Star Anise for Hair: सुंदर केस फक्त चांगले दिसत नाहीत तर आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यास देखील मदत करतात. पण व्यस्त जीवनशैलीमुळे वाढते ताण, खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि केसांवरील केमिकल ट्रीटमेंटमुळे आजच्या काळात बहुतांश लोक केस गळणे, कोरडे केस अशा अनेक समस्यांना तोंड देत आहेत. जर तुम्हालाही केसांची हरवलेली चमक परत मिळवून केसांची वाढ सुधारायची असेल तर तुमच्या किचनमध्ये ठेवलेला हा जादुई मसाला तुम्हाला मदत करू शकतो. या मसाल्याचे नाव चक्रफूल आहे.

चक्रफूलला इंग्रजीत स्टार अॅनेस असेही म्हणतात. हेअर केअरसाठी लोक बऱ्याच काळापासून चक्रफूलचा वापर करत आहेत. असे मानले जाते की स्टार अॅनिसमध्ये म्हणजेच चक्रफूलमध्ये असे अनेक गुणधर्म आहेत जे टाळू सुधारून केसांची स्थिती सुधारतात. केसांची चांगली काळजी घेण्यासाठी चक्रफूलचा वापर कसा करावा ते पाहूया.

चक्रफूलचे तेल

चक्रफूलचे तेल बनवण्यासाठी नारळ किंवा ऑलिव्ह ऑईल गरम करा. आता या तेलात चक्रफूल घाला आणि मंद आचेवर २ तास तेल उकळू द्या, म्हणजे तेलात चक्रफूलचे गुणधर्म मिसळतील. ठरलेल्या वेळेनंतर तेल गाळून घ्या. हे तेल एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये ठेवावे. या तेलाने टाळूची मालिश केल्यास केसांची वाढ सुधारू शकते.

चक्रफूलाचे पाणी

केस स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चक्रफूलचे पाणी सुद्धा वापरू शकता. यासाठी गरम पाण्यात चक्रफूल उकळून थंड होण्यासाठी ठेवावे. त्यानंतर केसांना शॅम्पू केल्यानंतर या पाण्याने केस धुवावे. काही मिनिटांनंतर तुम्ही पाण्याने केस धुवू शकता. स्टार अॅनीजमध्ये असलेले गुणधर्म केसांना सुगंधी बनविण्याबरोबरच त्यांचे पोषण आणि मजबुतीकरण करण्यास मदत करतात.

स्टार अॅनीज ऑइल मास्क

चक्रफूल आणि ऑलिव्ह ऑईल मास्क बनवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये बारीक केलेले चक्रफूल मिक्स करा. केसांना माइल्ड शॅम्पूने धुण्यापूर्वी हे तेल केसांना ३० मिनिटे लावून ठेवा. अर्ध्या तासानंतर केस धुवून घ्या.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग