Tips to make Oil from Hibiscus Flower: देवाच्या पूजेसाठी फुलांचा वापर केला जातो. प्रत्येक देवतेला काही फुले फार आवडतात. अशा परिस्थितीत देवी-देवतांना आपली आवडती फुले अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात, असे मानले जाते. गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणपती बाप्पाला लाल जास्वंदाचे फूल खूप आवडते, असे म्हटले जाते. गणेशोत्सवात गणपतीचे आवडते फूल सर्वत्र पहायला मिळत आहे. तसं तर तुम्ही जास्वंदाचे रोप एखाद्या कुंडीत देखील सहज वाढवू शकता. हेच कारण आहे की बहुतेक लोकांच्या बागांमध्ये ते सहज आढळते. जास्वंदाची फुले आरोग्यासह केसांसाठी उत्तम असतात. याच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी तेल बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या बाप्पाच्या आवडत्या फुलांपासून घरी तेल कसे बनवावे
जास्वंदाच्या फुलाचे तेल बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे -
- १ कप नारळाचे तेल
- ७-८ जास्वंदाची फुले
- ७-८ जास्वंदाची पाने
केसांसाठी तेल बनवण्यासाठी जास्वंदाची फुले आणि जास्वंदाची पाने घेऊन त्याची बारीक पेस्ट तयार करावी. नंतर एक कप खोबरेल तेल गरम करून त्यात ही पेस्ट घाला. आता हे मिश्रण काही मिनिटे गरम होऊ द्या. नंतर थंड करून साठवून ठेवा. तुमचे जास्वंदाच्या फुलाचे तेल तयार आहे.
जर तुम्हाला केस गळण्याची समस्या असेल किंवा तुमचे केस खूप कमकुवत होत असतील तर तुम्ही त्यात काही गोष्टी घालू शकता. कांद्याचा रस केसांसाठी खूप फायदेशीर आहे. तेल तापवताना त्यात कलौंजीचे दाणे आणि कढीपत्ता घालू शकता. या सर्व गोष्टी केसांसाठी चांगल्या आहेत.
हे तेल डोक्यावर लावण्यासाठी सर्वप्रथम केसांना नीट विंचरून घ्या. नंतर थोड्या थोड्या केसांचे पार्टिशन करून तेथे टाळूला तेल लावा आणि सुमारे १० मिनिटे मसाज करा. आहे हे केसांवर ३० मिनिटे राहू द्या. त्यानंतर तुमचे केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही कोणत्याही आयुर्वेदिक शॅम्पूने केस धुवू शकता.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)