मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care: केस कमकुवत होण्यामागे असू शकतात ‘ही’ प्रमुख कारणे! तुम्हीही करत नाही ना या चुका?

Hair Care: केस कमकुवत होण्यामागे असू शकतात ‘ही’ प्रमुख कारणे! तुम्हीही करत नाही ना या चुका?

Jun 16, 2024 09:22 AM IST

Hair Care Tips: केस खराब होण्याला अनेक कारणे जबाबदार आहेत, परंतु अशा काही गोष्टी आहेत, ज्या केसांच्या काळजी घेण्याशी निगडीत आहेत. यामुळे केस कमकुवत होतात आणि गळतात.

केस कमकुवत होण्यामागे असू शकतात ‘ही’ प्रमुख कारणे!
केस कमकुवत होण्यामागे असू शकतात ‘ही’ प्रमुख कारणे! (shutterstock)

Hair Care Tips: प्रत्येकाला मजबूत, दाट केस हवे असतात. त्यासाठी अनेक जण भरपूर प्रयत्नही करत असतात. पण, काही अशा गोष्टीही जाणून घेणे गरजेचे आहे, ज्या केसांची काळजी घेण्याशी संबंधित आहेत. अनेक लोक केसांची काळजी घेण्यसाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत असतात. मात्र, केसांची निगा राखण्याची योग्य पद्धत कोणती, याबद्दल फारशी माहिती सगळ्यांना नसते. यामुळेच केसांची काळजी घेण्याच्या नादात ते आपल्या केसांचे नुकसान करतात. ज्याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे.

सर्वसाधारणपणे हेअर स्टाइलिंग टूल्स, केमिकल प्रॉडक्ट्स, प्रदूषण आणि न्यूट्रिशनचा अभाव यामुळे आपल्या केसांचे नुकसान होते असे मानले जाते. पण, या सर्वांव्यतिरिक्त अशा काही अत्यंत सोप्या गोष्टी आहेत, ज्या निरोगी केसांना कमकुवत आणि खराब करतात.

Yoga Mantra: उन्हाळ्यात स्किन केअरचे टेन्शन दूर करतात ही योगासनं, नक्की करून पाहा

रोज केस भिजवणे

अनेकदा लहान केस असलेले लोक जास्त निष्काळजीपणा करताना दिसतात. लहान केस असलेले लोक अनेकदा आपल्या केसांची व्यवस्थित काळजी घेत नाहीत. तुमचेही केसही आखूड असतील, तर ते रोज भिजवू नका. रोज पाण्याने केस धुवून शॅम्पू देखील करू नका. त्यामुळे केस खराब होण्याची शक्यता वाढते. रोज अशा प्रकारे केस भिजवल्याने कोंडा वाढतो आणि केस गळण्याचा धोकाही वाढतो.

ट्रेंडिंग न्यूज

Good Morning Wishes: सकाळची करायची असेल बेस्ट सुरुवात तर प्रियजनांना पाठवा हे गुड मॉर्निंग मॅसेज

ओल्या केसांसह झोपणे

लहान केस असलेले लोक केसांची काळजी घेण्याच्या बाबतीत अनेकदा निष्काळजी असतात. ते ओल्या केसांसहच पलंगावर झोपी जातात. त्यामुळे केसांचे होणारे नुकसान आणखी वाढते. ओल्या केसांमध्ये खूप लवकर गुंता होतो आणि यामुळे केसांची मुळं कमकुवत होतात. ज्यामुळे केस किंचित चोळल्यावरही गळू लागतात. त्याचबरोबर स्काल्प ओली असताना त्यात बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे केसांचे नुकसान होते.

वारंवार केस विंचरणे

काही लोकांना असे वाटते की केस वारंवार विंचरणे अतिशय आवश्यक आहे. पण, जर तुम्ही देखील केस वारंवार विंचरत असाल, तर हे चूक करणे आताच थांबवा. केस कोरडे असताना विंचरले तरी त्यामुळे केसांचे नुकसान होते आणि केसांची मुळं कमकुवत होतात. यामुळे केस गळती वाढू लागते.

WhatsApp channel