मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Hair Care: त्वचाच नाही तर केसांसाठीही धोकादायक आहेत सूर्याचे युव्ही किरण, पाहा कसे करावे संरक्षण

Summer Hair Care: त्वचाच नाही तर केसांसाठीही धोकादायक आहेत सूर्याचे युव्ही किरण, पाहा कसे करावे संरक्षण

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 26, 2024 08:37 PM IST

Hair Care Tips for Summer: सूर्यकिरणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्यामुळे केसांचा बाह्य स्तर ज्याला क्युटिकल्स म्हणतात ते खराब होऊ लागतात. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते.

Summer Hair Care: त्वचाच नाही तर केसांसाठीही धोकादायक आहेत सूर्याचे युव्ही किरण, पाहा कसे करावे संरक्षण
Summer Hair Care: त्वचाच नाही तर केसांसाठीही धोकादायक आहेत सूर्याचे युव्ही किरण, पाहा कसे करावे संरक्षण (unsplash)

Tips to Protect Hair From Sun Damage: सूर्याचे अतिनील किरण केवळ तुमच्या त्वचेलाच नाही तर केसांनाही हानी पोहोचवतात. ऊन आणि वाढत्या तापमानाचा परिणाम तुमच्या चेहऱ्यासह केसांवर होतो. उन्हापासून चेहऱ्याचे संरक्षण करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करतात. परंतु केसांचा प्रश्न येतो तेव्हा ते बरेचदा निष्काळजी होतात. असे दीर्घकाळ केल्याने केस खराब होतात आणि तुटणे, फ्रिजी, गुंता होणे आणि कोरडे होऊ लागतात. इतकेच नाही तर कधी कधी केसांचा रंगही बदलू लागतो. कारण सूर्यकिरणांच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने केसांच्या बाहेरील थराला, ज्याला क्यूटिकल म्हणतात, खराब होऊ लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला उन्हाळ्यात उन्हापासून तुमच्या केसांचे संरक्षण करायचे असेल तर या टिप्स फॉलो करा.

ट्रेंडिंग न्यूज

उन्हापासून केसांचे संरक्षण करण्यासाठी टिप्स

केसांना डीप कंडिशन करा

केस धुतल्यानंतर अनेक जण कंडिशनर नक्कीच लावतात. कंडिशनर केसांवर संरक्षणात्मक थर तयार करून सूर्यामुळे होणाऱ्या नुकसानीपासून केसांचे संरक्षण करते. प्रदूषण, धूळ, हेअर स्टाइलिंग उपकरणे देखील केसांना इजा करतात. त्यामुळे केस निस्तेज आणि निर्जीव दिसू लागतात. केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे डीप कंडिशनिंग करा. असे केल्याने केसांमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि ते हायड्रेटेड देखील राहतील.

केस हायड्रेटेड ठेवणे महत्वाचे

नेहमी सूर्याच्या संपर्कात आल्याने केस कोरडे होऊ शकतात. अशा परिस्थितीत केसांमध्ये आर्द्रता चांगली ठेवण्यासाठी उन्हात बाहेर जाण्यापूर्वी पाणी पिण्याची खात्री करा.

हेअर सनस्क्रीनचा वापर

त्वचेला सूर्यापासून संरक्षण करण्यासाठी जितकी सनस्क्रीनची गरज असते तितकीच टाळूलाही सनस्क्रीनची गरज असते. केसांना कंगवा केल्यानंतर बाहेर जाण्यापूर्वी केसांना टाळूवर सनस्क्रीन लावा. हे अतिनील किरणांच्या थेट प्रभावापासून टाळू आणि केसांचे संरक्षण करण्यास मदत करेल.

सीरमचा वापर

केसांना कोणत्याही प्रकारच्या नुकसानीपासून वाचवण्यासाठी त्यांना योग्य प्रमाणात पोषण देणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी रोज हेअर सीरम वापरावे. हेअर सीरम केसांना आर्द्रता देऊन दुरुस्त करण्याचे काम करते.

आहारात अँटीऑक्सिडंट्सचा समावेश करा

सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे केसांना ऑक्सिडेटिव्ह नुकसान होते. अशा परिस्थितीत केसांवर होणारा परिणाम परत करण्यासाठी आहारात अधिकाधिक ताजी फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. तुमच्या आहारात अशा फळे आणि भाज्यांचा समावेश करण्याचे लक्षात ठेवा, ज्यात अँटीऑक्सिडंट गुणधर्म भरपूर आहेत.

टोपीचा वापर

उन्हाळ्यात उन्हामुळे केस कोरडे आणि रफ होतात. हे टाळण्यासाठी केस झाकून ठेवा. यासाठी तुम्ही तुमचे केस कॅप किंवा स्कार्फने झाकून घेऊ शकता. या पद्धतीमुळे केसांचे सन डॅमेजपासून रक्षण होईल.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel