
Hair Growth Toner: प्रत्येकाला लांब केस आवडतात. परंतु कधी कधी केसांची वाढ थांबते, ज्यामुळे समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत हेल्दी ग्रोथसाठी योग्य पोषणासोबत केसांची काळजी घेणे गरजेचे आहे. केसांची योग्य काळजी न घेतल्यास केस खूप निर्जीव आणि कोरडे होतात. त्यामुळे केस गळण्याची समस्या सुरू होते. हे कमी करण्यासाठी आणि केसांची चमक कायम ठेवण्यासाठी काही घरगुती पद्धती वापरल्या जाऊ शकतात. केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही हेअर टोनर बनवू शकता. यामुळे केसांच्या वाढीला चालना मिळेल. जाणून घ्या कसे बनवायचे हेअर ग्रोथ टोनर
अॅपल सायडर व्हिनेगरमध्ये अनेक महत्त्वाचे गुणधर्म असतात जे केसांचा कोरडेपणा आणि रफनेस कमी करण्यास मदत करतात. हे टोनर बनवण्यासाठी एका बॉटलमध्ये २ ग्लास पाणी आणि ४ चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिक्स करा. नीट मिक्स केल्यानंतर हे स्प्रे बॉटलमध्ये भरा. त्यानंतर शॅम्पूच्या अर्धा तास आधी स्काल्पवर टोनर स्प्रे करा आणि नंतर काही वेळ मसाज करा. काही वेळ वाट पाहिल्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. केस धुण्यासाठी सौम्य शॅम्पू वापरा.
ग्रीन टीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे केसांचा कोरडेपणा दूर करण्यास आणि केस गळण्यास प्रतिबंध करण्यास मदत करतात. हे टोनर बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी घालून गरम करा. आता त्यात ग्रीन टी बॅग्स घाला आणि पाण्याचा रंग बदलेपर्यंत गरम करा. रंग बदलला की थोडं थंड होऊ द्या आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे टोनर देखील शॅम्पू करण्यापूर्वी केसांना लावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या
