Hair Care: सणासुदीला केस पांढरे दिसतात? 'या' घरगुती उपयांनी नैसर्गिकरित्या केस होतील काळेभोर-hair care tips home remedies to turn white hair black naturally ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care: सणासुदीला केस पांढरे दिसतात? 'या' घरगुती उपयांनी नैसर्गिकरित्या केस होतील काळेभोर

Hair Care: सणासुदीला केस पांढरे दिसतात? 'या' घरगुती उपयांनी नैसर्गिकरित्या केस होतील काळेभोर

Sep 07, 2024 10:37 AM IST

Treatment for white hair: सणासुदीला पांढरे केस अनेकांचा आत्मविश्वास कमी करतात. आपल्या लूकबाबत फारच सजग असणाऱ्या लोकांना पांढरे केस घेऊन चारचौघात मिसळणे कठीण होते.

पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी टिप्स
पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी टिप्स

Tips to turn white hair black naturally: आजच्या बदलत्या जीवनशैलीत केस अकाली पांढरे होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. कमी वयात केस पांढरे होण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. अकाली केस पांढरे होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की चुकीच्या खाण्याच्या सवयी, खराब जीवनशैली, पोषणाचा अभाव किंवा तणाव होय. पांढऱ्या केसांमुळे तुम्ही तुमच्या वयापेक्षा मोठे दिसू लागता. शिवाय सणासुदीला पांढरे केस अनेकांचा आत्मविश्वास कमी करतात. आपल्या लूकबाबत फारच सजग असणाऱ्या लोकांना पांढरे केस घेऊन चारचौघात मिसळणे कठीण होते.

अशा परिस्थितीत लोक पांढरे केस लपवण्यासाठी मेहंदी किंवा रंग लावतात. परंतु त्यात केसांना हानी पोहोचवणारी रसायने असतात. पण आता काळजी करू नका. तुम्हाला हवे असल्यास काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही तुमचे केस काळे करू शकता. या लेखात आम्ही तुम्हाला पांढरे केस दूर करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत.

कॉफी आणि मेहंदी-

कॉफी आणि मेहंदीचे मिश्रण लावल्याने केस पांढरे होण्याची समस्या दूर होऊ शकते. केस काळे करण्याचा हा एक प्रभावी उपाय आहे. यासाठी एक चमचा कॉफी पावडर पाण्यात उकळा. पाण्याला उकळी आल्यावर त्यात ४-५ चमचे मेहंदी त्यात घाला. आता हे मिश्रण केसांना लावा. साधारण ३-४ तासांनी केस शॅम्पूने धुवून टाका. तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही प्रक्रिया पुन्हा करू शकता.

ब्लॅक टी-

पांढऱ्या केसांच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही काळ्या चहाचा अर्थातच ब्लॅक टीचाही वापर करू शकता. काळ्या चहामध्ये कॅफिन, फ्लेव्होनॉइड्स, गॅलिक ॲसिड आणि कॅटेचिनसारखे अनेक घटक असतात. हे सर्व घटक केसांना रंग देण्यास मदत करतात. याच्या वापराने केस नैसर्गिकरित्या काळे होऊ शकतात. यासाठी एक कप पाण्यात एक चमचा काळा चहा टाका आणि उकळवा. पाणी थंड झाल्यावर ते तुमच्या स्कॅल्पवर आणि केसांना लावा आणि काही मिनिटे मसाज करा. १ तासानंतर केस शॅम्पूने धुवून टाका. अशाप्रकारे तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही प्रक्रिया पुन्हा करू शकता. अशाने तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील.

मेथी दाणे-

पांढऱ्या झालेल्या केसांसाठी घरगुती उपायांमध्ये मेथीच्या दाण्यांचा वापर केला जाऊ शकतो. सांगायचंच झालं तर, मेथीच्या दाण्यांमध्ये अत्यावश्यक अमीनो ॲसिड असतात. जे केस अकाली पांढरे होण्यास प्रतिबंध करतात. यासाठी एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी मेथी दाणे बारीक करून त्याची पेस्ट बनवा. त्यानंतर ही पेस्ट तुमच्या स्कॅल्पवर आणि केसांना लावा. साधारण १ तासानंतर केस शॅम्पूने धुवून टाका. केसांना नैसर्गिकरित्या काळेभोर करण्यासाठी हा उपाय आठवड्यातून १ ते २ वेळा करा.

 

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. याबाबतीत संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

Whats_app_banner