What causes hair loss: केस निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला वारंवार आंघोळ करण्याची गरज भासते. परंतु घाईघाईत आंघोळ करताना आपण अनेक चुका करतो ज्यामुळे केसांचे नुकसान होऊ शकते. आंघोळ करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे जाणून घेणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आंघोळ केली तर केसांचा संरक्षणात्मक थर खराब होऊ शकतो आणि ते केस कोरडे देखील होऊ शकतात. हळूहळू केस गळायला लागतील आणि टक्कल पडायला सुरुवात होईल. चला जाणून घेऊया अंघोळ करताना केसांच्या बाबतीत कोणत्या चुका टाळाव्यात.
ज्याप्रमाणे हेअर ड्रायर आणि हेअर स्ट्रेटनरच्या उष्णतेमुळे तुमचे केस खराब होतात, त्याचप्रमाणे जर तुम्ही वारंवार केस गरम पाण्याने धुतले तर त्यामुळे तुमचे केस कमकुवत होतील आणि केसगळतीच्या समस्येला तोंड द्यावे लागेल. त्यामुळे अगदी कोमट पाण्याने केस धुतलेले योग्य असते. त्यामुळे शक्यतो केस धुण्यासाठी एकदम कडक पाणी घेणे टाळावे.
अनेक वेळा आपण शॅम्पूमधून फेस तयार करण्यासाठी केसांना जास्त घासतो, असे केल्याने केस खराब होतात ज्यामुळे नंतर टक्कल पडू शकते. केसांना हलक्या हाताने शॅम्पू लावा. आणि मुळापर्यंत पसरवा. जेणेकरून केस तुटणार नाहीत किंवा कमकुवत होणार नाहीत.
केस धुण्यासाठी योग्य शॅम्पूनिवडणे फार महत्वाचे आहे. जर तुमचे केस कोरडे असतील तर तेलकट केसांसाठी बनवलेला शॅम्पू वापरू नका, यामुळे फायद्याऐवजी नुकसान होईल. शॅम्पू निवडताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे केसांना नुकसान होण्याची शक्यता कमी असते.
केसांच्या मुलायमपणासाठी आपण अनेकदा कंडिशनर वापरतो. परंतु ते टाळूवर लावू नये याची काळजी घेणे आवश्यक आहे, कारण यामुळे केसांची मुळे कमकुवत होऊ शकतात. केसांची मुळेच कमकुवत झाल्याने केस मोठ्या प्रमाणात गळायला सुरुवात होते.
जर तुम्ही हेअर ड्रायरने केस सुकवत असाल तर, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही पद्धत योग्य नाही कारण हेअर ड्रायरच्या गरम हवेमुळे केस कमकुवत होतात आणि कापडाने केस कोरडे केल्याने केस तुटतात. . केस सुकविण्यासाठी नैसर्गिक हवा पुरेशी आहे. तुमचे केस काही तासांत पूर्णपणे कोरडे होतील, जर घाई असेल तर केसांना टॉवेल गुंडाळून अतिरिक्त पाणी काढून टाका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)