मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Grey Hair: केस लवकर पांढरे होत आहेत? लावा आयुर्वेदात सांगितलेली ही खास पेस्ट, दिसेल फरक

Grey Hair: केस लवकर पांढरे होत आहेत? लावा आयुर्वेदात सांगितलेली ही खास पेस्ट, दिसेल फरक

Hiral Shriram Gawande HT Marathi
Apr 22, 2024 12:00 PM IST

Hair Care Tips: जर तुम्हाला लहान वयात केस पांढरे होणे, केस गळणे, कोंडा आणि कोरडेपणाचा त्रास होत असेल तर आयुर्वेदिक पद्धतीनुसार हा घरगुती हेअर पॅक लावा. केसांच्या समस्यांपासून लवकरच सुटका मिळेल.

Grey Hair: केस लवकर पांढरे होत आहेत? लावा आयुर्वेदात सांगितलेली ही खास पेस्ट, दिसेल फरक
Grey Hair: केस लवकर पांढरे होत आहेत? लावा आयुर्वेदात सांगितलेली ही खास पेस्ट, दिसेल फरक

Ayurvedic Remedy for Hair Problem: आजकाल केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. वयाच्या ३० व्या वर्षी केस पांढरे झाल्याने अनेकांना त्रास होतो. तर केस गळणे सुद्धा सामान्य झाले आहे. त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक प्रकारचे उपाय केले आहेत. तर आता आयुर्वेदात सांगितलेले हे खास हेअर पॅक ट्राय करा. काही दिवसातच केसांच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळेल.

ट्रेंडिंग न्यूज

केसांच्या या समस्यांपासून मिळेल आराम

गरजेपेक्षा जास्त तणाव केसांना कमकुवत करते आणि केस पांढरे होऊ लागतात. हे पांढरे झालेले केस लपविण्यासाठी हेअर कलरचा वापर केल्यावर केस कमकुवत होऊन तुटायला लागतात आणि केस झपाट्याने पांढरे होतात. कोंडा आणि कोरडेपणा देखील सामान्य आहे. या सर्व केसांच्या समस्यांवर हा आयुर्वेदिक उपाय प्रभावी ठरू शकतो.

दही आणि आवळा लावा

जर तुम्हाला अकाली पांढरे होण्याची आणि केस गळण्याची समस्या असेल तर या दोन गोष्टी मिक्स करून पेस्ट तयार करा.

- एक वाटी दही

-दीड टीस्पून आवळा पावडर

या दोन गोष्टी मिक्स करून रात्रभर राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी केस ओले करून घ्या. आवळा पावडर दह्यात भिजवून केसांच्या मुळांवर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. नंतर सुमारे दहा मिनिटे तसेच राहू द्या. १० मिनिटांनी केस धुवा. आठवड्यातून दोनदा हा हेअर पॅक लावल्याने केस अकाली पांढरे होण्याची आणि केस गळण्याची समस्या काही वेळा धुतल्यानंतर कमी होईल. याशिवाय कोरडेपणा आणि कोंड्याची समस्याही कमी होईल.

आवळा पावडर आहे फायदेशीर

आवळा केसांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यातील व्हिटॅमिन ईचे प्रमाण केसांना नैसर्गिकरित्या कंडीशन करण्याचे काम करते.

केस पांढरे होण्याची समस्या संपेल

आयुर्वेदानुसार शरीरात पित्त वाढल्याने केस पांढरे होण्याची समस्या उद्भवते. आवळा आणि दही पित्त वाढण्यास प्रतिबंध करते. त्यामुळे पांढऱ्या केसांची समस्याही हळूहळू कमी होऊ लागते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel

विभाग