Mistakes Making While Oiling Hair: सुंदर लांब काळे केस तुचे सौंदर्य वाढवण्यात मोठी भूमिका बजावतात. केस सुंदर आणि निरोगी ठेवण्यासाठी त्यांची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. यामुळेच तुमच्या घरातील वडिलधारे तुम्हाला केसांना तेल लावण्याचा सल्ला देत असल्याचे तुम्ही नेहमीच पाहिले असेल. केसांना तेल लावल्याने त्यांचे पोषण होते, ते दाट आणि निरोगी होतात. तज्ज्ञांच्या मते, चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावावे. केसांना तेल लावण्याचे अनेक फायदे होतात. पण जर केसांना तेल चुकीच्या पद्धतीने लावले तर केसांची वाढ थांबत नाही तर केस गळणे देखील वाढते. चला जाणून घेऊया केसांना तेल लावताना होणाऱ्या चुका, ज्यामुळे केसांना फायद्याऐवजी नुकसान होते.
बरेचदा लोक केसांना खूप चोळून तेल लावतात. असे केल्याने केस कमकुवत आणि निर्जीव होतात आणि तुटायला लागतात. केसांना तेल लावताना केसांना नव्हे तर टाळूवर तेलाने मसाज करा. असे केल्याने केस दाट आणि मजबूत होतात.
बाजारात उपलब्ध असलेली सर्व महागडी तेल केसांच्या आरोग्यासाठी चांगली असतीलच असे नाही. आजकाल बाजारात उपलब्ध असलेले अनेक महागडे हेअर ऑइल रसायनांनी भरलेले असतात. हे तेल वापरल्यास केस निर्जीव होऊन गळू लागतात. अशा परिस्थितीत केसांना नेहमी नैसर्गिक तेल वापरा. यामुळे केसांना कोणतीही हानी होत नाही.
बऱ्याच लोकांना असे वाटते की केसांमध्ये तेल जेवढे जास्त काळ टिकते तेवढे केसांना अधिक पोषण मिळते. त्यामुळे अनेक जण रात्री झोपण्यापूर्वी केसांना तेल लावतात. पण ही धारणा पूर्णपणे चुकीची आहे. ज्यांची त्वचा तेलकट आहे त्यांनी असे केल्यास त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या होऊ शकते. जर तेल जास्त काळ केसांमध्ये राहिल्यास ते जास्त धूळ आणि घाण आकर्षित करते. तेल डोक्यातील बुरशीचे पोषण करते आणि वाढण्यास मदत करते. त्यामुळे डोक्यात कोंड्याची समस्या सुरू होते.
तेल लावल्यानंतर केसांची चांगली वाढ होण्यासाठी बरेच लोक केस घट्ट बांधतात. पण केस कधीही जास्त घट्ट बांधू नयेत. कारण मसाज केल्यावर टाळू मऊ होते आणि केस घट्ट बांधल्यास केस तुटू शकतात.
केसांना तेल लावण्यापूर्वी तेल थोडे गरम करा. यानंतर कोरड्या केसांना आणि टाळूला तेल लावून हलक्या हातांनी मसाज करा. यानंतर केसांना काही वेळ तेल लावून राहू द्या आणि नंतर सौम्य शॅम्पूने धुवा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)