Mistakes Should Avoid While Applying Hair Oil: प्रत्येकाला दाट, लांब आणि मजबूत केस हवे असतात. त्यासाठी आपल्या डेली रुटीनमध्ये हेअर केअरच्या अनेक गोष्टी केल्या जातात. त्यातीलच एक म्हणजे केसांना तेल लावणे. केसांना नियमितपणे तेल लावून मसाज करणे खूप फायदेशीर म्हटले जाते. पण अनेक वेळा केसांना तेल लावताना काही चुका होतात आणि त्याचा फायदा होण्याऐवजी नुकसान होतो. केसांना तेल लावताना नीट काळजी घेतली नाही तर केस गळण्याची समस्या देखील वाढू शकते. त्यामुळे केसांना तेल लावताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच कधी चुकीच्या पद्धतीने तेल लावल्यामुळे किंवा केसांना तेल लावताना चुका केल्यामुळे सुद्धा केसांचे नुकसान होते. जाणून घ्या केसांना तेल लावताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे.
बऱ्याच लोकांना केसांना तेल लावल्यानंतर वेणी घालण्याची सवय असते. अनेक वेळा घट्टी वेळी घातली जाते. तसेच तेल लावल्यानंतर अनेकदा घट्ट पोनीटेल किंवा अंबाडा बांधला जातो. पण असे करणे टाळावे. कारण केस बांधल्यानंतर ते सहज तुटतात. म्हणूनच तेल लावल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या केसांची स्टाइल टाळली पाहिजे.
बरेच जण केसांना केवळ तेल लावल्यानंतर भरपूर वेळ मसाज करतात. असे करू नका. केसांना तेल लावल्यानंतर मसाज केल्याने खूप आराम मिळतो. असे केल्याने तेल मुळांपर्यंत पोहोचते असे म्हणतात. परंतु ते खूप जास्त वेळ करणे टाळले पाहिजे. तेल लावल्यानंतर ५ मिनिटे मसाज पुरेसे आहे.
केसांना तेल लावल्यानंतर लगेच ते विंचरू नयेत. असे केल्याने केस खराब होण्याची शक्यता असते आणि केस जास्त प्रमाणात तुटू लागतात. तुम्ही तेल लावण्यापूर्वी केस विंचरू शकता. त्यामुळे तेल लावल्यानंतर तसे करण्याची गरज नाही. तेल लावल्यानंतर केस विंचरले तर ते तुटण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे केसांना तेल लावल्यानंतर कधीच विंचरू नका.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या