method of making natural hair color marathi: पांढरे केस लपवण्यासाठी लोक सर्वप्रथम पार्लरमध्ये जाऊन केसांना रंग लावतात. पण, केमिकल हेअर कलर्सचे दुष्परिणामही काही लोकांच्या केसांवर दिसतात. वास्तविक, केसांच्या रंगांमध्ये असलेल्या रसायनांमुळे केसांना खूप नुकसान होऊ शकते. त्यामुळे हे हेअर कलर्स वारंवार वापरल्यास केसांचा पोत बिघडू शकतो आणि केस गळण्याची समस्याही वाढू शकते. अशा स्थितीत केस काळे करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेलाचाही वापर करू शकता. यामुळे तुमच्या केसांचा रंग नैसर्गिकरित्या काळा राहतो. तर केसांना पोषणही मिळते. ज्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतात.
खोबरेल तेल लावल्याने केस खराब होण्याची शक्यता फारच कमी असते. ज्यामुळे ते केसांसाठी सुरक्षित उपाय ठरते. त्याच वेळी, नारळाच्या तेलामध्ये असलेले निरोगी फॅट्स केसांना चांगले पोषण देतात, केसांना ताकद देतात आणि केस मऊ, चमकदार आणि निरोगी बनवतात.जर तुम्ही तुमचे केस रंगविण्यासाठी नैसर्गिक उपाय शोधत असाल, तर तुम्ही खोबरेल तेल कसे वापरू शकता ते आज आपण पाहूया.
-३-४ चमचे मेंदी पावडर
-२ चमचे कांद्याच्या बिया
-२-३ चमचे चहाची पाने (चहा पावडर)
-२ चमचे कॉफी पावडर
-एक वाटी खोबरेल तेल
-सर्वप्रथम एका भांड्यात एक ग्लास पाणी उकळत ठेवा.
-आता यामध्ये कॉफी, भाजलेल्या कांद्याच्या बियांची पावडर आणि मेंदी पावडर घाला.
-नंतर त्यात खोबरेल तेल घाला.
-सर्वकाही मिक्स करून मंद गॅसवर तापवून घ्या. नंतर,गॅस बंद करून ते थंड होऊ द्या.
-त्यात गरजेनुसार खोबरेल तेल मिसळू शकता.
-त्यानंतर हे मिश्रण केसांना लावा आणि एक ते दीड तास तसंच राहू द्या.
-यानंतर केस पाण्याने धुवा. तुम्ही कोणताही सौम्य शॅम्पूदेखील वापरू शकता.