Hair Care: तुमचेही केस लहान वयातच पांढरे झालेत? 'हा' घरगुती उपाय केल्यास काळे कुळकुळीत होतील केस-hair care if you too have white hair turn it black with this natural home remedy ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Hair Care: तुमचेही केस लहान वयातच पांढरे झालेत? 'हा' घरगुती उपाय केल्यास काळे कुळकुळीत होतील केस

Hair Care: तुमचेही केस लहान वयातच पांढरे झालेत? 'हा' घरगुती उपाय केल्यास काळे कुळकुळीत होतील केस

Aug 11, 2024 08:38 AM IST

Hair care Tips: मुले असो किंवा मुली, त्यांना लहान वयातच केस पांढरे होण्याचा त्रास उद्भवत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खाण्याच्या सवयी आणि बदलेली जीवनशैली.

hair care
hair care

Home remedies for black & Strong hair: आजच्या काळात केस पांढरे होणे ही अतिशय सामान्य बाब आहे. एकही केस पांढरा दिसला की लोक काळजी करू लागतात. मुले असो किंवा मुली, त्यांना लहान वयातच केस पांढरे होण्याचा त्रास उद्भवत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे खाण्याच्या सवयी आणि बदलेली जीवनशैली. जर तुम्हीही पांढऱ्या केसांच्या समस्येने त्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आपले केस काळे व्हावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते. आणि अशा परिस्थितीत लोक केमिकलयुक्त प्रॉडक्टस वापरण्यास सुरुवात करतात. ज्यामुळे केस पांढरे होण्याची समस्या अधिक वेगाने वाढू लागते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला पांढऱ्या केसांपासून सुटका हवी असेल, तर तुम्ही हे घरगुती उपाय नक्की करा. त्यामुळे तुम्हाला काहीच दिवसांत फरक दिसून येईल.

आयुर्वेदानुसार आपल्या घरात अनेक पदार्थ आहेत, ज्याच्या वापराने आपण अनेक आरोग्यविषयक समस्या दूर करू शकतो. कमी वयातच पांढऱ्या झालेल्या केसांवरसुद्धा घरगुती उपाय करतात येतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. बहुतांश भारतीय घरांच्या अंगणात आवळ्याचे झाड असते. त्यामुळेच तुम्ही घरी मिळणारा आवळा, चहापूड किंवा कॉफी यांची पेस्ट बनवून त्याला हेअर मास्कप्रमाणे वापरू शकता.

 यासाठी सर्वप्रथम, आवळा आणि चहापूड एका भांड्यात रात्रभर भिजवून ठेवा. आणि सकाळी त्यामध्ये कॉफी पावडर टाकून आणि गाळून घ्या. आता ही पेस्ट तुमच्या केसांच्या मुळांना लावा. १ ते २ तासांनी केस धुवून घ्या. सांगायचं झालं तर, यासोबत तुम्ही मेहंदीदेखील वापरू शकता. आयुर्वेदानुसार आवळ्यामध्ये आढळणारे घटक केवळ नैसर्गिकरित्या केस काळे करत नाहीत तर केस मजबूत ठेवण्यास देखील मदत करतात.

आवळ्याचे इतर फायदे-

आवळा पांढरे झालेले केस काळे करण्यासोबतच अनेक फायदेसुद्धा देतो. आवळा केसांची वाढ करण्याचेही काम करतो. आयुर्वेदानुसार, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे कोलेजन वाढण्यास मदत होते. कोलॅजन केसांची ताकद वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते. कोलॅजनसाठी आवळा हा एक चांगला पर्याय आहे. आवळ्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक मुबलक प्रमाणात आढळतात. ज्यामुळे केस मजबूत होतात आणि तुटण्याचे प्रमाण कमी होते. आवळा नियमित वापरल्यास तुमचे केस कधीही पांढरे होणार नाहीत आणि ते जाड आणि आकर्षकही दिसतील.

केसांचे संरक्षण-

आवळा हा फ्री- रॅडिकल्सच्या नुकसानीपासून केसांचे संरक्षण करण्यास मदत करते. यामुळे दुभंगलेल्या केसांची समस्या दूर होते. शिवाय केस चमकदार आणि मऊ बनतात. आवळ्याच्या नियमित वापराने टाळूवर अर्थातच केसांच्या मुळांशी साचलेली घाण साफ होते आणि केस गळणेही कमी होते.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

विभाग