Deadlifts Workout Tips: महाराष्ट्र केसरी पैलवान विक्रम पारखी यांचा जिममध्ये व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने जीम लव्हरच्या मनात भिती पसरली आहे. जीममध्ये डेडलिफ्ट हा अत्यंत कठीण कार मानला जातो. डेडलिफ्ट करताना झालेल्या काही चुका जीवघेण्या ठरू शकतात. यामुळे डेडलिफ्ट करताना कोणती काळजी घेतली पाहिजेत? याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घेऊयात.
डेडलिफ्ट करताना शरिराला योग्य स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. डेडलिफ्ट करताना तुमची पाठ सरळ आणि छाती वर ठेवा. डेडलिफ्ट करताना पाठीवर ताण येऊ देऊ नका. डेडलिफ्ट करताना जर इतर दुसरीकडे प्रेशर येतोय का? असे जाणवल्यास लगेच थांबा.
डेडलिफ्ट असो किंवा जीममधील कोणताही प्रकार असो, वार्म-अप खूप गरजेचे असते. वॉर्म-अपमुळे संभाव्य दुखापती टाळल्या जाऊ शकतात. वार्म-अपमध्येही अनेक प्रकार असतात. त्यामुळे कोणत्या दिवशी कुठला वार्म-अप करायचा, हे आज जीममध्ये कोणत्या प्रकारचा व्यायाम करणार? यावर अवलंबून असते. बहुतेक लोक दररोज एकसारखाच वार्म-अप करतात, जे देखील नुकसानदायक नसते.
डेडलिफ्ट दरम्यान चुकीची हालचाल मोठ्या दुखापतीला आमंत्रण देऊ शकते. चुकीच्या हालचालीमुळे स्नायूंवर ताण येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे संपूर्ण नियंत्रण ठेवूनच डेडलिफ्ट केली करा.
संबंधित बातम्या