Blouse Designs: गुढीपाडव्याला प्रत्येक जण पारंपारिक पोशाख घालण्याचा विचार करतात. मराठी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी महिला पारंपारिक पद्धतीने तयार होतात. या दिवशी अनेक ठिकाणी महिला नऊवारी साडी नेसून रॅली सुद्धा काढतात. पण जर तुम्हाला नऊवारी साडी नेसणं शक्य नसेल आणि तुम्ही साधी साडी नेसण्याचा विचार करत असाल तर तु्म्ही त्यासोबत ट्रेंडी डिझाईनचे ब्लाउज पेअर करू शकता. हे विविध ब्लाउजचे डिझाईन तुमच्या साध्या साडीला सुद्धा स्टायलिश लुक देईल.
जर तुम्हाला स्टायलिश दिसायचे असेल तर स्लीव्हलेस ब्लाउज सर्वात आकर्षक दिसतो. विशेषत: जान्हवी कपूरप्रमाणेच यू शेप ब्लाउजचे डिझाइन एकदम परफेक्ट दिसेल.
जर तुम्हाला स्लीव्हजवर काही प्रयोग करायचा असेल तर स्लीव्हजमध्ये प्लीट्स घालून बनवू शकता. हे एक अतिशय सुंदर आणि फेमिनिन लुक देईल.
जर तुम्हाला बॅकलेस ब्लाउज घालायचा असेल तर हॉल्टर नेक खूप सुंदर दिसतो. प्लेन रंगाच्या साडीसोबत शिमरी वर्क असलेला हॉल्टर नेक ब्लाउज कॅरी करा. सर्वांच्या नजरा तुमच्यावर असतील.
तुम्हाला एक अनोखी डिझाईन आणि ग्लॅमरचा टच जोडायचा असेल, तर तुम्ही स्वत:साठी बनवलेला व्ही नेक शेप सोबत स्पेगेटी स्लीव्ह ब्लाउज घालू शकता. हे खूपच सुंदर दिसते.
जर तुम्हाला ब्लाउजमध्ये काही प्रयोग करायचा असेल तर तुम्ही फुल स्लीव्ह घालू शकता. बेल स्लीव्ह किंवा रफल स्लीव्ह व्यतिरिक्त, बिशप स्लीव्हची ही डिझाईन साध्या साडीलाही स्टायलिश करेल. हे तुम्हाला पारंपारिक लुक देखील देईल.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या