Winter Breakfast Recipe: हिवाळ्यात हिरव्या भाज्या बाजरात येतात. ज्याचे आवर्जून या ऋतूमध्ये सेवन करावे. हिरव्या भाज्या म्हणजे पालेभाज्याच नाहीत तर यामध्ये हिरवा हरभराही येतो. हा हिरवा हरभरा पोषक तत्वांनी समृद्ध असतो. हे चवीलाही उत्कृष्ट तर आहेच पण सोबतीला हे फारच हेल्दी आहे. हरभरा हा जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियमचा खजिना आहे. कॅल्शियम आपल्या हाडांसाठी खूप महत्वाचे आहे. याशिवाय यामध्ये फायबरचे प्रमाणही चांगले असते, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. यापासून तुम्ही भाजी, चाट, कोशिंबीर, पराठा अशा अनेक प्रकारे खाऊ शकता यासोबतच हरभऱ्यामध्ये झिंक, लोह आणि मॅग्नेशियम असते. हे सर्व पोषक तत्व आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक आहेत. चला या पासून हेल्दी नाश्ता कसा बनवायचा ते...
हिरवे हरभरे - २०० ग्रॅम, १ ते २ बटाटे उकडलेले आणि लहान चिरलेले, तेल - १ टेबलस्पून, जिरे - १ टीस्पून, १ कांदा बारीक चिरलेला, १ टोमॅटो बारीक चिरून, १ कप धणे बारीक चिरून, १/२ काकडी, बारीक चिरून चवीनुसार मीठ, भाजलेले जिरे पावडर - १/२ टेबलस्पून, चाट मसाला - १ टीस्पून, लाल तिखट चवीनुसार, लिंबाचा रस
> सर्वप्रथम हिरवे हरभरे कुकरमध्ये एक शिटी होईपर्यंत शिजवा.
> नंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, हिंग, परतून घ्या आणि नंतर उकडलेले हरभरे घाला.
> मीठ घालून मिक्स करा.
> आता त्यात बटाटे आणि लाल तिखट घालून मिक्स करा आणि गॅस बंद करा.
> वाटीत हिरवे हरभरे घाला. त्यात कांदा, टोमॅटो, काकडी आणि हिरवी कोथिंबीर घाला.
> नंतर त्यात जिरेपूड, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून मिक्स करा.
> वर चाट मसाला शिंपडा आणि सर्व्ह करा
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या