Republic Day 2024: सर्च इंजिन गुगलने भारताच्या ७५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त एक खास डूडल जारी केले आहे, ज्यामध्ये ॲनालॉग टीव्हीच्या युगापासून स्मार्टफोनच्या युगापर्यंत देशात झालेला बदल दाखवण्यात आला आहे. एका क्रिएटिव्ह कलाकृतीद्वारे, प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. एका शैलीत काही दशकांमध्ये सगळं कसं बदलेलं आहे हे दाखवण्यात आले आहे. भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारी १९५० रोजी प्रजासत्ताक झाला.
कॅथोड रे ट्यूबसह मोठ्या टीव्ही सेटपासून ते लहान टीव्ही आणि अखेरीस स्मार्टफोनपर्यंत, गेल्या काही वर्षांत भारतात बरेच काही बदलले आहे. या डूडलमध्ये पहिल्या ॲनालॉग टेलिव्हिजन सेटच्या डाव्या बाजूला 'G' अक्षरासह दोन टीव्ही संच आणि एक मोबाइल फोन दाखवण्यात आला आहे आणि सेटचे स्क्रीन 'Google' चे दोन 'O' बनवतात. गुगल लोगोची उर्वरित तीन अक्षरे 'G', 'L' आणि 'E' त्या क्रमाने ठेवलेल्या मोबाइल हँडसेटच्या स्क्रीनवर दिसतात. पहिला टीव्ही स्क्रीनवर काळ्या आणि पांढऱ्या रंगात परेडची दृश्ये दाखवत आहे, तर दुसरा उंटांचा संघ दाखवतो, जो तंत्रज्ञानातील बदल दर्शवत आहे.
गुगलच्या नोटनुसार, "हे डूडल भारताच्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध केले गेले आहे, जो १९५० मध्ये भारतीय संविधान स्वीकारला गेला आणि राष्ट्राने स्वतःला एक सार्वभौम, लोकशाही आणि प्रजासत्ताक राज्य घोषित केले त्या दिवसाचे स्मरण होते. आजचे डूडल, अतिथी कलाकार वृंदा जावेरी यांनी चित्रित केले आहे, हे प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधील बदल दर्शवत आहे."
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या