Aerial Views Of Natural Beauty: दरवर्षी २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन किंवा जागतिक पृथ्वी दिवस म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी हा दिवस एका थीमसह साजरा केला जातो. जागतिक पृथ्वी दिन २०२४ ची थीम ‘प्लॅनेट वर्सेस प्लास्टिक’ आहे. या दिवसानिमित्त गुगलने आपले डूडलही एका खास पद्धतीने बदलले आहे. यावेळी गुगलने डूडलद्वारे ग्रहाचे हवाई दृश्य दाखवले आहे. गुगलने डूडलमध्ये ग्रहाचे नैसर्गिक दृश्य दाखवले आहे, त्याशिवाय समृद्ध जैवविविधता दर्शविणारी हवाई फोटो दाखवली आहेत, जी येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी निसर्गाचे जतन करण्याचे महत्त्व देतात. याशिवाय गुगलने डूडलमध्ये विविध निसर्ग दृश्ये दाखवणाऱ्या प्रत्येक फोटोचे डिटेल स्पष्टीकरण दिले आहे.
निसर्ग मातेचे महत्त्व आणि निसर्ग आणि पृथ्वीचे जतन करणे ही आपली नैतिक जबाबदारी कशी आहे हे लोकांना कळावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. जागतिक वसुंधरा दिन २०२४ ची थीम आहे, ‘प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक्स’ आहे. ही प्लास्टिक प्रदूषणाची चिंताजनक समस्या आणि पर्यावरणावरील त्याचे भयंकर परिणाम यावर प्रकाश टाकते.
जागतिक पृथ्वी दिन २०२४ दिनानिमित्त गुगल लोगोचे प्रत्येक अक्षर पृथ्वीच्या नैसर्गिक जागेचे हवाई दृश्याद्वारे दर्शविले जात आहे. 'G' हे अक्षर तुर्क आणि कैकोस बेटांची प्रतिमा आहे, 'O' ही मेक्सिकोमधील स्कॉर्पियन रीफ नॅशनल पार्कची प्रतिमा आहे, ज्याला Arrecife de Alacranes असे म्हणतात, हे मेक्सिकोच्या दक्षिणेकडील आखातातील सर्वात मोठे रीफ आहे आणि ते युनेस्को बायोस्फीअर रिझर्व्ह देखील आहे. दुसरा 'O' हा २००८ मध्ये स्थापन झालेल्या आइसलँडच्या Vatnajökull राष्ट्रीय उद्यानाचा फोटो आहे. हे राष्ट्रीय उद्यान युरोपमधील सर्वात मोठ्या हिमनदीचे रक्षण करते आणि म्हणूनच ते युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे.
'G' हे ब्राझीलमधील जाउ नॅशनल पार्क आहे जे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे आणि ॲमेझॉन रेनफॉरेस्टमधील एक मोठं जंगल राखीव आहे. नायजेरियातील आफ्रिका युनियनने सुरू केलेल्या ग्रेट ग्रीन वॉलसह 'L' तयार झाला आहे; वनीकरणाद्वारे देशभरातील वाळवंटीकरणाचा मुकाबला करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. 'E' हे ऑस्ट्रेलियातील पिलबारा बेटांचे निसर्ग राखीव आहे जे ऑस्ट्रेलियाच्या २० निसर्ग साठ्याचा भाग आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)
संबंधित बातम्या