Google Birth Anniversary: गॅरेजमधून झालेली गुगलची सुरुवात; वाचा जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनची 'ही' रंजक तथ्ये-google birth anniversary interesting facts about the worlds largest search engine ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Google Birth Anniversary: गॅरेजमधून झालेली गुगलची सुरुवात; वाचा जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनची 'ही' रंजक तथ्ये

Google Birth Anniversary: गॅरेजमधून झालेली गुगलची सुरुवात; वाचा जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिनची 'ही' रंजक तथ्ये

Sep 27, 2024 09:22 AM IST

Who started Google: गुगलशिवाय क्वचितच कोणाचाही दिवस उजाडत असेल आणि रात्र संपत असेल. अगदी छोट्याशा माहितीसाठीही गुगल आवश्यक आहे.

google Birth Anniversary
google Birth Anniversary (freepik)

Google birthday:  जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन म्हणजेच गुगल होय. आज गुगलला २६ वर्षे पूर्ण झाली आहेत. या २६ वर्षांत, गुगलशिवाय क्वचितच कोणाचाही दिवस उजाडत असेल आणि रात्र संपत असेल. अगदी छोट्याशा माहितीसाठीही गुगल आवश्यक आहे. गुगल प्रत्येक प्रश्नाची उत्तरे अगदी तत्परतेने देऊन आपल्याला आनंदित करते. शिवाय आपले कामही अगदी सोपे करते. आपल्याला तब्बल २६ वर्षांपूर्वी या सर्च इंजिनची गरज भासली होती. ज्याने आज जगभरात आपला ठसा उमटवला आहे. गुगलचे हे जग कसे अस्तित्वात आले आणि ते सुरू करण्याची योजना कशी मनात आली, या सर्व गोष्टी या बातमीत आपण जाणून घेणार आहोत.

Google चा जन्म का आणि कधी झाला?

Google ला अस्तित्वात येऊन अनेक वर्षे उलटून गेली आहेत असे मानले जाते की, त्याचा जन्म ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाला आहे. गुगल हे अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात त्यांच्या पीएचडी प्रकल्पाचा एक भाग म्हणून विकसित करण्यात आले होते. त्यांचे उद्दिष्ट एक शोध इंजिन तयार करणे हे होते. जे त्यांच्या लिंकवर आधारित वेब पेजची गुणवत्ता मोजू शकेल.

तुम्हाला माहिती आहे का, की आधी गुगलचे नाव हे नसून ते 'बॅकब्रेन' असे ठेवण्यात आले होते. पण नंतर त्याचे नाव 'गुगल' असे ठेवण्यात आले, जे 'गुगोल' (गणितातील १०० क्रमांकाचे शेवटचे दोन शून्य) वरून घेतले गेले. ९० च्या दशकातील हे सर्च इंजिन डिजिटल युगातही धुमाकूळ घालत आहे. खरं तर त्याची स्थापना ४ सप्टेंबर १९९८ रोजी झाली होती. परंतु त्याला अधिकृतपणे २७ सप्टेंबर १९९८ रोजी Google Inc. म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर या दिवसापासून गुगलचा वाढदिवस २७ सप्टेंबरला साजरा केला जातो.

  • 'गुगल'बाबत रंजक तथ्ये-

-गुगलवर दररोज १५० भाषांमध्ये कोट्यवधी सर्च केले जातात आणि तुम्हाला २० हून अधिक डेटा सेंटरमधून हा सर्च डेटा प्राप्त झाला आहे.

-तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण लॅरी पेज आणि सर्जे ब्रिन यांच्यातील पहिल्या भेटीत कोणत्याही गोष्टीवर एकमत झाले नाही आणि हे दोघेही Google चे सह-संस्थापक आहेत हे तुम्हाला माहीत असेलच.

– फेसबुकला गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाते, त्यानंतर यूट्यूब आणि गुगलचा क्रमांक लागतो.

- गुगलचे चार रंग निळा, लाल, पिवळा, आणि हिरवा गुगलला आकर्षकपणे सादर करतात.

-गुगलचे पहिले नाव बॅकब्रेन होते.कारण गुगल सुरुवातीला फक्त वेब लिंकवर अवलंबून होते. नंतर २७ सप्टेंबर १९९८ रोजी Google Inc.चा अधिकृतपणे जन्म झाला.

-गुगलला सुरुवातीला गुगुल असे नाव देण्यात आले होते. जे गणिताची संज्ञा आहे. गणितात शंभर शून्ये एकत्र लिहिण्यासाठी ही संज्ञा वापरली जाते.

-२००६ मध्ये गुगलने शब्दकोषात क्रियापद म्हणून या शब्दाचा समावेश केला. मेरियम-वेबस्टर डिक्शनरीमध्ये 'गुगल' या शब्दाचा अर्थ कोणतीही माहिती मिळवण्यासाठी वर्ल्ड वाइड वेबवर शोधणे असा आहे.

 

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner
विभाग