Good Morning Wishes: “माझ्यामुळे तुम्ही नाही, तर तुमच्यामुळे मी आहे”, सकारात्मक विचाराने करा दिवस
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: “माझ्यामुळे तुम्ही नाही, तर तुमच्यामुळे मी आहे”, सकारात्मक विचाराने करा दिवस

Good Morning Wishes: “माझ्यामुळे तुम्ही नाही, तर तुमच्यामुळे मी आहे”, सकारात्मक विचाराने करा दिवस

Jan 11, 2025 09:44 AM IST

Shubha Sakal Message: आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी सकारात्मक आणि सुंदर संदेश शोधतात. जर तुम्हीही शुभ सकाळचे संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message (pixabay)

Good Morning Message In Marathi:  जेव्हा तुमच्या प्रिय व्यक्तीने शुभ सकाळ म्हटले तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक सुंदर होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी सकारात्मक आणि सुंदर संदेश शोधतात. जर तुम्हीही शुभ सकाळचे संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला सर्वोत्तम संदेश मिळतील ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.

 

“माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर “तुमच्यामुळे मी आहे”

ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात

आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं

पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.

 

जिव्हाळायाचे ऋणानुबंध

असल्याशिवाय कोणी कोणाच्या

आयुष्यात येत नाही.

सुप्रभात

 

सोन्याचा साठा करुन मिळालेल्या

श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून

मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…

शुभ सकाळ

 

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध

हा येणारच, आणि आपली

माणसे किती लांब असली

तरी आठवण ही येणारच…

शुभ सकाळ

आपुलकी असेल तर जीवन सुंदर

फुले असतील तर बाग सुंदर

गालातल्या गालात एक छोटस हसु असेल

तर चेहरा सुंदर आणि

नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर

शुभ सकाळ

 

छापलेली पुस्तके वाचल्याने

खरे ज्ञान मिळत नाही.

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने

खरे ज्ञान मिळते, कारण

छापलेल्या पुस्तकांचे लेखक

अनेक असतात पण

अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक

आपण स्वत: असतो.

शुभ सकाळ

 

नारळ आणि माणूस

दर्शनी कितीही चांगले

असले तरीही नारळ

फोडल्या शिवाय आणि

माणूस जोडल्याशिवाय

कळत नाही.

 

आयुष्यात काही आठवणी विसरता येत नाहीत आणि

काही तोडता येत नाहीत.

जीवनात माणसं दुरावली तरी मन नाही दुरावत

चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत…

सकाळच्या सुंदर शुभेच्छा

Whats_app_banner