Good Morning Messages: वीकेंडला मौजमजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आळशीपणामुळे मंडे ब्ल्यूज येऊ लागल्यास हे गुड मॉर्निंग मेसेज तुम्हाला मदत करू शकतात. खरं तर मॉर्निंग ब्लूज म्हणजे ती सकाळ जेव्हा तुम्हाला काहीही करावेसे वाटत नाही आणि सोमवारी सकाळी तुम्हाला उदास वाटते. दर सोमवारी या आळशीपणामुळे आपला दिवस सुरू होण्यास उशीर होतो आणि त्यामुळे ऑफिसला सुद्धा उशीरा पोहोचतो. जर तुमच्याबाबतीत असे वारंवार घडत असेल तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेज तुमच्या आळशीपणावर मात करू शकतात आणि तुमच्या दिवसाची सुरुवात लवकर आणि आनंदाने करू शकतात.
आनंद मिळवण्यासाठी काम कराल
तर आनंद मिळणार नाही
पण आनंदी होऊन काम कराल
तर नक्कीच आनंद मिळेल
शुभ प्रभात
विश्वास ठेवा, आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले करत असतो
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा
कुठेतरी काही चांगले घडत असते
गुड मॉर्निंग
ज्या इच्छा तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहेत,
त्या सर्व इच्छा सोडून द्या
आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा.
गुड मॉर्निंग
कालचा दिवस कितीही वाईट असला तरी निघून गेला,
दुसऱ्या दिवसाची सुरुवात हसत-खेळत करा.
गुड मॉर्निंग
यशस्वी झाल्याने जग आपल्याला ओळखते
आणि अपयशी ठरल्याने आपण जगाला ओळखतो.
गुड मॉर्निंग
इतरांकडून तुम्हाला जे अपेक्षित आहे
ते एकदा स्वतःसोबत करून पाहा,
तुमच्या आयुष्याची नव्याने सुरुवात होईल.
गुड मॉर्निंग
देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही,
आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपले विचार,
आपले वर्तन आणि आपली कृती आपले नशीब लिहिते!
शुभ प्रभात!
प्रत्येक 'वेळ' जीवनाप्रती दयाळू असेल, हे शक्य नसते,
काही 'क्षण' जगण्याचा अनुभवही शिकवतात.
गुड मॉर्निंग
संबंधित बातम्या