Good Morning Wishes: दिवसाची सुरुवात तेव्हाच सुंदर होते, जेव्हा सकाळी कोणीतरी तुम्हाला प्रेमाने ‘गुड मॉर्निंग’ म्हणते. आजकाल लोक एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी नेहमीच चांगले मेसेज शोधत असतात. जर, तुम्हालाही आपल्या प्रियजनांना सकाळी आनंदी करायचे असेल आणि त्यांच्या दिवसाची सुरुवात एका खास प्रेरणादायी विचाराने करायची असेल, तर ‘हे’ मोटिव्हेशनल गुड मॉर्निंग मेसेज तुमच्याला उपयोगी पडतील. शुभ सकाळ म्हणतानाच नव्या दिवसाची एक नवी प्रेरणा देणारे हे मेसेज पाठवून तुम्ही तुमच्या प्रियजनांना खास अंदाजात गुड मॉर्निंग म्हणू शकता.
संघर्ष नाही, वेदना नाही,
असं जगण्यात मजाही नाही!
शुभ प्रभात!
मोठ मोठी वादळंही थांबतील,
तुम्ही तुमच्या जिद्दीची ढाल पुढे तर करा!
शुभ सकाळ
नशीब माणसाच्या धाडसाची परीक्षा घेतं,
स्वप्नांचे पडदे, डोळ्यांवरून हटवतं
काहीही झालं तरी मागे नका फिरू,
अडखळत होईल तुमचा नवा प्रवास सुरू!
गुड मॉर्निंग
अनेक चढ-उतारानंतरही, जर कुणी तुमची साथ सोडली नाही
तर, त्या व्यक्तीला कधीही स्वतःपासून दूर करू नका,
अशी माणसं नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत आणि तुम्ही खूप नशीबवान आहात!
गुड मॉर्निंग
येणारी प्रत्येक 'वेळ' ही तुमच्यासाठी सुखद असेल असे नाही!,
काही 'क्षण' जगण्याचा अनुभवही शिकवतात.
शुभ प्रभात
देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही,
आपले विचार, आपले वर्तन आणि कर्म आपले नशीब लिहितात.
शुभ प्रभात!
जे लोक इतरांना मदत करण्यास सदैव तत्पर असतात,
ते आयुष्यात कधीही दु:खी आणि अस्वस्थ नसतात!
शुभ सकाळ
प्रत्येक सकाळ एक नवीन आशीर्वाद आहे,
आयुष्य आपल्याला रोज दुसरी संधी देतं!
कारण तुम्ही त्यास पात्र आहात.
तुम्हाला या नव्या दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्य कधीच सोपं नसतं, ते सोपं करावं लागतं.
कधी कधी स्टाईलनं, तर कधी नजरचुकीनं!
गुड मॉर्निंग
चांगल्या कामाची भीती वाटत असेल तर लक्षात ठेवा,
तुमचं हे काम खरोखरच शौर्याचं असल्याचं आहे
त्यात भीती आणि जोखीम नसती, तर ते कुणीही केलं असतं!
गुड मॉर्निंग
संबंधित बातम्या