Good Morning Message: या धावपळीच्या जगात चिंता आणि तणाव या सामान्य बाबी आहेत. अशा परिस्थितीत आपल्याला सकारात्मक ऊर्जेची गरज असते. म्हणूनच आपले जवळचे लोक आणि मित्र सकाळी लवकर आपल्याला काही मौल्यवान विचार पाठवतात.अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही एखाद्याच्या दिवसाची सुरुवात आनंदी करायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी आजचे चांगले विचार घेऊन आलो आहोत, ज्यामुळे तुमच्या जवळच्या खास व्यक्तींचा दिवस सकारात्मक उर्जेने भरून जाईल.
''आपला दिवस आनंदी जावो
एखाद्या अडचणीत देवाने तुमचे
लगेच ऐकले कि तुमची श्रद्धा वाढते
उशिरा ऐकले कि, तुमची सहनशक्ती वाढते
पण ऐकलेच नाही तर
समजून जा की देवाला ठाऊक आहे
हि अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता
स्वतःवर विश्वास ठेवा''
''नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणारी
संकटावर मात केल्याशिवाय
यशस्वीतेचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश
नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे..''
''निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही''
शुभ सकाळ !
''वडील देव आहेत आईची माया
धरणीमातेपेक्षाही महान आहे आणि वडीलांचे स्थान
आभाळापेक्षाही उंच आहे जगात कुणी कुणाला
आपल्यापेक्षा पुढे गेलेला बघू शकत नाही
परंतु एक आई वडीलच असे आहेत की,
जे आपल्या मुलाला आपल्यापेक्षाही
पुढे गेलेले पाहून आनंदी होतात''
सुप्रभात!
''कोणी तुमचा सन्मान करो अथवा ना करो
तुम्ही तुमचे कर्तव्य करीत चांगले काम करत रहा
नेहमी लक्षात ठेवा
करोडो लोक झोपेत असतात म्हणून
सूर्य आपला विचार कधीही बदलत नाह
सुर्योदय हा होतोच''
सुप्रभात !
''प्रत्येकाचा “आदर ” करणे हा आपल्या स्वभावातला
एक सुंदर दागिनाच नव्हे तर एक प्रकारची गुंतवणूक
आहे ती आपल्याला व्याजासकट नक्की परत मिळते''
सुप्रभात !
''देवाकडे काही मागायचे
असेल तर नेहमी आईचे स्वप्न
पूर्ण व्हावे हा आशीर्वाद मागा,
तुम्हाला कधी स्वत:साठी
काही मागयची गरज पडणार नाही''
गुड मॉर्निंग!
''जिथे दान देण्याची सवय असते
तिथे संपत्तीची कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते
तिथे माणसांची कमी नसते
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत''
शुभ सकाळ!
''तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही,
अशी भीती कधीच बाळगु नका
कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा
गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते''
शुभ सकाळ !
''इतरांना खाली पाडणारा व्यक्ती ताकदवान नसतो
पडलेल्यांना उचलणारा व्यक्ती खरा ताकदवान असतो
श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते
कायम टिकनारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी''
शुभ सकाळ!