Good Morning Wishes: 'तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता...', या सकारत्मक संदेशांसह करा दिवसाची सुंदर सुरुवात
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: 'तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता...', या सकारत्मक संदेशांसह करा दिवसाची सुंदर सुरुवात

Good Morning Wishes: 'तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता...', या सकारत्मक संदेशांसह करा दिवसाची सुंदर सुरुवात

Nov 20, 2024 08:52 AM IST

Shubh Sakal marathi message: आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी गोड आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message (pixabay)

Good Morning Marathi Message:  जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी गोड आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला 10 सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.

 

प्रत्येकात काही विशेष गुण असतातच

पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या

झाडावर चढण्याच्या क्षमतेवर

करू लागलात तर तुम्ही

सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.

 

शुभ सकाळ

दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.

तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील

एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.

 

तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता.

तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात

तर दुर्बळ बनाल

आणि सामर्थ्यशाली समजलात

तर सामर्थ्यशाली बनाल

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,

जी तुमच्या आवाजावरून तुमच्या

सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..

 

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील…

शुभ सकाळ!

 

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,

मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,

आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,

ती पण तुमच्या सारखी..!

शुभ सकाळ!

 

जो फक्त वर्षाचा विचार करतो,

तो धान्य पेरतो…

जो दहा वर्षाचा विचार करतो,

तो झाडे लावतो…

जो आयुष्यभराचा विचार करतो,

तो माणुस जोडतो…

शुभ सकाळ !

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…

नाते सांभाळायचे असेल तर

चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,

आणि,नाते टिकवायचे असेल तर

नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..

शुभ सकाळ!

 

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.

सुप्रभात शुभ सकाळ!

 

Whats_app_banner