मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Summer Heat : प्रखर उन्हात बाहेर पडताय?, थांबा, त्याआधी या गोष्टींची घ्या काळजी
Summer Heat
Summer Heat (HT)
14 May 2022, 8:03 AM ISTAtik Sikandar Shaikh
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
14 May 2022, 8:03 AM IST
  • गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात प्रचंड उकाड्यानं लोक हैराण झाले आहेत. त्यामुळं या उष्ण वातावरणापासून काळजी घेण्यासाठी काय करायला हवं, वाचा...

सध्या महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात प्रचंड उष्णतेची लाट आलेली आहे. वाढलेल्या उन्हामुळं अनेक लोकांना दुपारी बाहेर पडणं कठीण झालेलं आहे. परंतु नोकरीचा किंवा पोटापाण्याचा प्रश्न असलेल्या लोकांना उदरनिर्वाह करण्यासाठी बाहेर पडावंच लागतच आहे. परंतु असं करणं तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. कारण जेव्हा उन्हाचा तडाखा वाढतो तेव्हा व्यक्तीला उष्णाघात होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळं वाढलेल्या या उष्ण वातावरणात आपल्या आरोग्याची काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊयात.

ट्रेंडिंग न्यूज

वाढलेल्या उष्णतेपासून कशी काळजी घ्याल?

वाढलेल्या उन्हाळ्यात रिकाम्यापोटी बाहेर पडणं हे आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असते. कारण जेव्हा तुम्ही काहीही न खाता बाहेर पडता तेव्हा तुम्हाला दिवसभर थकवा आल्यासारखं वाटू शकतं. अशावेळी उन्हात बाहेर पडताना पोटभर जेवण करायला हवं.

पाण्याची बाटली सतत सोबत ठेवा...

जर तुम्ही दिवसभरासाठी किंवा काही वेळासाठी बाहेर पडत असाल तरीही सोबत गार पाण्याची बाटली ठेवायलाच हवी. कारण वाढलेल्या उष्णतेमुळं व्यक्तीला वारंवार तहाण लागत असते. सतत पाणी पित राहिल्यानं तुम्ही हायड्रेटेड राहाल आणि तुमच्या शरीरावर उष्ण सूर्यप्रकाशाचा कोणताही परिणाम होणार नाही.

त्वचा आणि चेहऱ्याची काळजी घ्या...

वाढत्या उन्हामुळं त्याचा सर्वाधिक विपरित परिणाम हा त्वचा आणि चेहऱ्यावर होत असतो. त्यामुळं उन्हात बाहेर पडताना चेहरा, मान आणि हात सूती कापडानं झाकायला हवं. त्यामुळं उष्णतेपासून बचाव करणं शक्य होतं. याशिवाय त्वचा आणि चेहऱ्याचा उष्ण सूर्यप्रकाशापासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीनचाही वापर करायला हवा. त्याचबरोबर बाहेरून, उन्हातून आल्यानंतर चेहरा चांगल्या क्लिन्झरने धुवून त्यावर मॉइश्चरायझर लावायला हवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

  • Share on Twitter
  • Share on FaceBook

विभाग