Global Family Day: मुलांनी आजी-आजोबासोबत वेळ घालवणे का गरजेचे आहे? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Global Family Day: मुलांनी आजी-आजोबासोबत वेळ घालवणे का गरजेचे आहे? जाणून घ्या

Global Family Day: मुलांनी आजी-आजोबासोबत वेळ घालवणे का गरजेचे आहे? जाणून घ्या

Jan 01, 2024 11:31 PM IST

Kids Personality Development: पालक कामानिमित्त बाहेर असल्यामुळे मुले घरी एकटी असतात. अशावेळी आजी आजोबांचा त्यांना मोठा आधार असतो. शिवाय हे त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे.

आजी आजोबासोबत वेळ घालवल्याने मुलांचा होणारा विकास
आजी आजोबासोबत वेळ घालवल्याने मुलांचा होणारा विकास (unsplash)

Importance of Spending Time With Grandparents: आजकाल लोकांना न्यूक्लियर फॅमिली हवी असते. परिवारात त्यांना कोणताही डिस्टर्बंस नको असतो. त्यांचे आयुष्य आरामात जगता यावे असे त्यांना वाटते. पण या विभक्त कुटुंबाचा मुलांवर खोलवर परिणाम होतो. आजी-आजोबांचा आधार मुलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आजकाल मुलं आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल, टीव्ही आणि गॅजेट्सवर घालवतात. पण आजी-आजोबांसोबत राहिल्यास ते अधिक व्यस्त राहतील आणि काहीतरी नवीन शिकतील. त्यामुळे त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होते. या कारणांमुळे मुलांनी आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे महत्त्वाचे आहे. आजी आजोबासोबत मुलांनी वेळ घालवला तर कसा परिणाम होतो हे जाणून घ्या.

मुलांना सांस्कृतिक मूल्ये समजतात

जेव्हा मुले आजी-आजोबांसोबत राहतात आणि जास्त वेळ घालवतात तेव्हा त्यांना त्यांच्या चालीरीती अधिक समजतात आणि कळतात. सांस्कृतिक मूल्यांवर जोर दिला जातो आणि नवीन गोष्टी शिकतात. सण कसे साजरे करावेत आणि प्रथा काय आहेत याची माहिती फक्त तुमच्यापुरतेच संपत नाही तर तुमच्या मुलांना सहज उपलब्ध होतात.

मुले गोष्टी शेअर करतात

मुले आजी-आजोबांसोबत असतात तेव्हा त्यांचे आयुष्य सोपे होते. कधी कधी अशा काही गोष्टी असतात जे मुले पालकांना सांगायला घाबरतात. पण त्याच गोष्टी ते आजी-आजोबांना अगदी सहज शेअर करतात. हे मुलाला त्याच्या अडचणींवर मात करण्यास मदत करते. तसेच विनाकारण ताण आणि तणावाचा मुलांवर परिणाम होत नाही.

मानसिक विकास होतो

मुले आजी-आजोबांसोबत वेळ घालवतात तेव्हा त्यांचा मानसिक विकास होतो. दिवसभर एकटे आणि गप्प बसण्याऐवजी ते आजी-आजोबांसोबत मजा करतात आणि नवीन गोष्टी शिकतात. वर्किंग लाइफमुळे पालक आपल्या मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत मुलं आजी-आजोबांसोबत वेळ घालवतात तेव्हा त्यांचा नीट मानसिक विकास होतो.

मूल्ये शिकणे

परदेशातील लोकांनाही भारतीय समाजातील संस्कार, मूल्ये आवडतात. पण आता आपल्या समाजातील लोक त्यांना विसरत चालले आहेत. मुलं आजी-आजोबांसोबत राहिली तर ते ही सर्व मूल्य शिकू शकतात. देवाला प्रार्थना करणे, मोठ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेणे, सर्वांचा आदर करणे, ही सर्व संस्कार आजी-आजोबांसोबत राहिल्याने येतात.

 

नैतिक विकास

आजी-आजोबांसोबत राहून मुलांना नैतिक शिक्षणही मिळते. आजी-आजोबा मुलांना नैतिक शिक्षण म्हणजे काय हे कथा, कविता आणि गोष्टींतून शिकवतात. त्यांचा मोरल विकास होतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner