मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Global Day of Parents 2024: आपल्या पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी करा या सकारात्मक गोष्टी!

Global Day of Parents 2024: आपल्या पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी करा या सकारात्मक गोष्टी!

Jun 01, 2024 03:07 PM IST

Global Day of Parents 2024: जसजसे आपले पालक वृद्ध होतात तस तसे त्यांना मानसिक आरोग्यात घट होऊ शकते. त्यांना नैराश्य, चिंता आणि स्मृतिभ्रंश होण्याचा धोका असतो. अशा वेळी आपण काय करू शकतो हे जाणून घ्या.

ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स - पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक गोष्टी
ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स - पालकांच्या मानसिक आरोग्यासाठी सकारात्मक गोष्टी (Pexels)

Positive Things For Parent's Mental Health: आपले आई-वडील आपले संपूर्ण आयुष्य आपल्याला सर्वोत्तम प्रकारे वाढविण्यासाठी समर्पित करतात. आपण मोठे झाल्यावरही आपल्याला आधार देत राहतात. तथापि जसजसे ते वृद्ध होतात तसतसे त्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागू शकते. कारण वृद्धत्व अनपेक्षित मार्गांनी त्यांचे जीवन बदलू शकते. वृद्धांना चिंता, नैराश्य किंवा स्मृतिभ्रंश यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा धोका वाढतो. ते काही जुनाट रोग देखील विकसित करू शकतात जे त्यांच्या हालचाली आणि गतिशीलता मर्यादित करू शकतात. ते कोणत्या परिस्थितीतून जात आहेत हे समजून घेण्यासाठी वेळ काढणे आणि त्यांना उपाय सुचविणे त्यांना सपोर्टेड वाटण्यास मदत करू शकते आणि ते निरोगी आणि आनंदी आहेत याची खात्री करू शकते. दरवर्षी १ जून रोजी ग्लोबल डे ऑफ पॅरेंट्स हा दिवस साजरा केला जातो. या खास दिनानिमित्त जाणून घ्या तुम्ही तुमच्या पालकांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी कोणत्या सकारात्मक गोष्टी करू शकता.

ट्रेंडिंग न्यूज

पालकांचे मानसिक आरोग्य राखण्यासाठी करा या सकारात्मक गोष्टी

सहानुभूती दर्शवा आणि सक्रियपणे ऐका

सहानुभूती दाखवणं आणि सक्रिय ऐकणं ही पालकांचं मानसिक आरोग्य जपण्याची सर्वात प्रभावी पद्धतींपैकी एक आहे. त्यांच्याशी अर्थपूर्ण संवाद साधण्यासाठी वेळ काढा, त्यांचे विचार आणि भावना मनापासून ऐका. त्यांच्या भावना समजून घेणे आणि त्या मान्य करणे त्यांच्यासाठी आपले मन मोकळं करण्यास आणि चिंता कमी करण्यास मदत करते.

सेल्फ केअर अॅक्टिव्हिटींना प्रोत्साहित करा

तुमच्या पालकांना स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहन देणे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. त्यांना आवडणारे छंद जसे की बागकाम, पेंटिंग, वाचन किंवा माइंडफुलनेसचा सराव करण्यासाठी प्रोत्साहित करा. स्वतःची काळजी घेण्यासाठी प्रोत्साहन देऊन तुम्ही तुमच्या पालकांना त्यांचं स्वतःचं सुख आणि आरामाला प्राधान्य देण्यास मदत करता आणि त्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते.

पालकांना सामाजिक होण्यासाठी प्रोत्साहित करा

मुलांमुळे आपल्या मूळ गाव सोडून आलेल्या किंवा स्थलांतरमुळे मित्रांचा संपर्क तुटलेल्या पालकांसाठी आपल्या वयाच्या मित्रांचा सहवास आणि समाजातील सहभाग महत्त्वाचा असतो. मुलांवर अवलंबून न राहता स्वतःचा सोशल सर्कल तयार करणं गरजेचं असतं. त्यामुळे पालकांना त्यांच्या वयाच्या लोकांशी मित्रत्व करण्यासाठी प्रोत्साहित करा. बाहेर फिरायला नेण्याची किंवा चित्रपट/पार्टीची व्यवस्था करा.

त्यांच्यासोबत क्वालिटी टाइम घालवा

तुमच्या पालकांसोबत क्वालिटी टाईम घालवणे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेमंद ठरू शकते. एकत्रित आनंद घेऊ शकणार्‍या गोष्टी प्लॅन करा, जसे की वॉकला जाणे, ट्रीप, चित्रपट पाहणे, खेळ खेळणे किंवा अगदी मनमोकळ्या गप्पा मारणे. या क्षणांमुळे आनंद मिळतो आणि आठवणीही कायम राहतात.

प्रॅक्टिकल सपोर्ट द्या

तुमच्या पालकांना रोजच्या कामांमध्ये मदत करणे त्यांचं ताण कमी करण्यास आणि त्यांच्या मनाची शांतता राखण्यास मदत करते. घरातील कामं, किराणा मालाची खरेदी किंवा आर्थिक व्यवस्थापन यामध्ये त्यांना मदत करा. तुमची मदत मिळाल्याने ते त्यांना आनंद आणि समाधान देणाऱ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतात. ज्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्य चांगलं राहायला मदत होते.

आपली कृतज्ञता व्यक्त करा

तुमच्या पालकांचे आभार आणि प्रेम व्यक्त करा. त्यांच्या प्रयत्नांची आणि यशस्वीतेची दखल घ्या आणि ते तुमच्यासाठी किती महत्वाचे आहेत ते त्यांना सांगा. 'धन्यवाद' म्हणणे, मनापासून लिहिलेल्या नोट्स किंवा मिठी मारणे हे छोटेसे सोपे गेस्चर त्यांच्या आत्मसन्मानावर आणि भावनिक आरोग्यावर खूप मोठा प्रभाव पाडू शकतात.

निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन द्या

शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे एकमेकांशी खूपच जवळचे असतात. तुमच्या पालकांना निरोगी जीवनशैलीला प्राधान्य देण्यासाठी प्रोत्साहित करा. एकत्रित व्यायाम करा, संतुलित आहार तयार करा किंवा त्यांना नियमित झोपेची सवय लावण्यासाठी मदत करा. निरोगी जीवनशैली त्यांच्या सर्वसाधारण आरोग्यात सुधारणा करते आणि त्यांची मानसिक ताकद वाढवते.

प्रोफेशनलची मदत घ्या

तुमच्या पालकांचं मानसिक आरोग्य बिघडत असल्याचं आणि त्यामुळे त्यांचं दैनंदिन जीवन प्रभावित होत असल्याचं तुम्हाला जाणवत असल्यास त्यांना व्यावसायिक मदत घेण्यासाठी प्रोत्साहित करा. थेरपिस्ट, समुपदेशक किंवा मानसिक आरोग्य सहाय्यता गट शोधण्यासाठी त्यांना मदत करा. कधीकधी, व्यावसायिक मार्गदर्शन त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी उपयुक्त साधनं आणि ट्रिक्स पुरवू शकते.

WhatsApp channel