मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Global Day of Parents 2023: आयुष्यात शिकलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आज माना तुमच्या पालकांचे आभार!

Global Day of Parents 2023: आयुष्यात शिकलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी आज माना तुमच्या पालकांचे आभार!

Tejashree Tanaji Gaikwad HT Marathi
Jun 01, 2023 07:30 AM IST

Happy Parents Day 2023: पालक-मुलाच्या नातेसंबंधाचा गौरव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दरवर्षी १ जून रोजी जागतिक पालक दिन साजरा केला जातो.

Parents Day 2023
Parents Day 2023 (Pixabay )

Global Day of Parents 2023: आयुष्यात आईवडीलच असतात जे तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करतात. ते मुलांकडून कोणत्याही फायद्याची अपेक्षा करत नाहीत. ते आपल्या सर्व मुलांशी समान वागणूक देतात आणि त्यांच्या प्रगतीसाठी आपले जीवन समर्पित करतात. या सुंदर पालक-मुलाच्या नातेसंबंधाचा गौरव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे दरवर्षी १ जून रोजी जागतिक पालक दिन साजरा केला जातो. जागतिक पालक दिनाला हॅपी पॅरेंट्स डे असेही म्हणतात. हा दिवस पहिल्यांदा १९९४ मध्ये अमेरिकेत साजरा करण्यात आला. त्यानंतर जगातील इतर देशही या यादीत सामील झाले आहेत. या जागतिक पालक दिनानिमित्त, आपल्या पालकांना शुभेच्छा द्या आणि त्यांना सांगा की तुमचे त्यांच्यावर किती प्रेम आहे.

पालकांना पाठवा हे शुभेच्छा संदेश

> मातृ देवो भव...

पितृ देवो भव

जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

> वेळ बदलते,काळ बदलतो

परिस्थिती बदलते, माणसं बदलतात

पण आईवडिलांच प्रेम कधीच बदलत नाही

कारण, ते प्रेम निस्वार्थ असतं.

जगातील सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

> देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे

आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

जागतिक पालक दिनाच्या शुभेच्छा!!

> आपल्या पाल्यासाठी दिवसरात्र झटणा-या

तसेच त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी अथक परिश्रम करणा-या

सर्व पालकांना जागतिक पालक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!!

> देवाचे आशीर्वाद म्हणजे आई-वडील,

आई-वडील ही जगाची अनमोल देणगी आहे,

अरे देवा! एकच प्रार्थना आहे

मला प्रत्येक जन्मात तुझ्याकडून हेच पालक हवे आहेत.

हैप्पी पेरेंट्स डे!

(मेसेज क्रेडिट: सोशल मीडिया)

WhatsApp channel