Unique names for daughters: तुमच्या घरी लवकरच नवीन छोट्या पाहुण्यांचे आगमन होणार असेल तर त्यांच्यासाठी जोरदार तयारी सुरु असेल. या सर्वात महत्त्वाची एक गोष्ट असते ती म्हणजे होणाऱ्या बेबीचे नावं काय ठेवायचे. असं म्हणतात की मुलांच्या नावाचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर खूप प्रभाव पडतो.आपण आपल्या मुलांची ज्या प्रकारे नावं ठेवतो, ती भविष्यात तशीच बनतात असेही ,मानले जाते. मुलांच्या या नावांचा त्यांच्या वागण्यावर, सवयींवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव ठेवायचे असेल तर तुम्ही योद्धा प्रेरित नाव ठेवू शकता. मुलगी धैर्य, आत्मविश्वास आणि शक्तीने परिपूर्ण बनवायची असेल आणि तिच्यासाठी नाव शोधत असाल ज्याचा अर्थ योद्धा असेल तर तुम्ही तिला शूर आणि धैर्यवान बनवू शकता. नावांची यादी आणि त्यांचे अर्थ जाणून घ्या.
> युहाना
जर तुम्हाला तुमच्या मुलीचे नाव य अक्षरावरून ठेवायचे असेल तर युहाना हे एक अद्वितीय नाव आहे ज्याचा अर्थ शूर, सुंदर, देवाची भक्त आणि बुद्धिमान आहे.
> दिविजा
दिविजा हे नाव आकाशात जन्मलेल्या किंवा योद्धा असलेल्या व्यक्तीशी संबंधित आहे.
रितिजा हे देखील एक अतिशय अनोखे आणि सुंदर नाव आहे, ज्याचा अर्थ धैर्यवान, हुशार तसेच सुंदर आणि निष्पाप आहे.
> आयुधिना
आयुधिना हे नाव एक अतिशय सुंदर आणि अद्वितीय नाव आहे, जे संस्कृत भाषेतून आले आहे, त्याचा अर्थ शास्त्र आहे.
हे नाव ऊर्जा प्रतिबिंबित करते आणि याचा अर्थ शूर किंवा धैर्यवान आहे.
> विरुषा
विरुषा हे नाव तुमच्या मुलीसाठी एक अतिशय युनिक आणि सुंदर नाव आहे, ज्याचा अर्थ खरा, खंबीर आणि धैर्यवान असा आहे.
सुर्विया हे नाव शूर आणि धैर्यवान व्यक्तीचे प्रतीक आहे. जर तुम्हाला तुमची मुलगी मजबूत आणि धैर्यवान बनवायची असेल तर तुम्ही तिला हे नाव देऊ शकता.
> ईश्वासा
लहान मुलीचे ईश्वासा नाव देखील अतिशय अनोखे आणि सुंदर आहे ज्याचा अर्थ योद्धा असा आहे.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ याची पुष्टी करत नाही.)