Ginger Benefits: आजच प्यायला सुरुवात करा आल्याचा रस! साखर नियंत्रणात ठेवण्यासोबत वजनही घटवते
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ginger Benefits: आजच प्यायला सुरुवात करा आल्याचा रस! साखर नियंत्रणात ठेवण्यासोबत वजनही घटवते

Ginger Benefits: आजच प्यायला सुरुवात करा आल्याचा रस! साखर नियंत्रणात ठेवण्यासोबत वजनही घटवते

Published Jul 25, 2024 08:54 AM IST

Ginger juice Benefits: आल्याचा चहा तर बहुतांश सगळेच पितात. मात्र आल्याच्या ज्यूस विषयी तुम्ही ऐकलंय का?

आल्याच्या ज्यूसचे फायदे
आल्याच्या ज्यूसचे फायदे

भारतीय खाद्य संस्कृती जगभरात प्रसिद्ध आहे. प्रत्येक भारतीयांच्या स्वयंपाक घरात काही पदार्थ आवर्जून आढळतात. यातीलच एक म्हणजे आले होय. आल्याचे अनेक उपयोग आपण पाहात आलो आहे. आले जेवणाची चव तर वाढवतेच शिवाय चहामध्येही उत्तम ठरते. खानपानाऐवजी आले औषधी गुणधर्मांनीसुद्धा परिपूर्ण आहे. आल्याचे अनेक औषधीय गुणधर्म आहेत. आल्याचा चहा तर बहुतांश सगळेच पितात. मात्र आल्याच्या ज्यूस विषयी तुम्ही ऐकलंय का? आल्याचा चहा जितका चविष्ट असतो. त्यापेक्षा दुपट्ट आल्याचा ज्यूस फायदेशीर असतो. जर तुम्ही अजूनही आल्याचा ज्यूस पिला नसेल तर आजच तुमच्या लाइफस्टाइलमध्ये आल्याच्या ज्यूसचा समावेश केला तरी हरकत नाही.

आले हे औषधीय असल्याने त्याची चव थोडीशी तिखट असते. त्यामुळे अनेकांना आले खाणे आवडत नाही. मात्र चहामध्ये लोक आवर्जून आल्याचा वापर करतात. आल्याचा चहा पिल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. सध्या पावसाळा सुरु आहे. पावसामुळे अनेक प्रकारचे आजार पसरत असतात. शिवाय वातावरण बदलल्याने सर्दी, खोकला, तापसुद्धा येतो. अनेकजण अशा स्थितीत घशाला आराम देण्यासाठी आल्याचा चहा पिणे पसंत करतात. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार आल्याच्या चहापेक्षा आल्याचा रस घेणे अधिक फायदेशीर असते. आल्याच्या रसाचे अर्थातच ज्यूसचे अनेक फायदे आहेत.

आल्याच्या ज्यूसचे फायदे कोणते?

रिपोर्ट्सनुसार, दररोज आल्याचा रस सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आल्याच्या रसामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते. याशिवाय, आल्याच्या रसामुळे एचएसबीसीची पातळी देखील सुधारते. जर तुमच्या शरीरावर सूज येत असेल किंवा तुमचे स्नायू सतत दुखत असतील, तर आल्याच्या रसाच्या सेवनाने तुम्हाला आराम मिळतो. आल्याचा रस नियमित पिल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहून गुड कोलेस्ट्रॉल वाढते.

महिलांना पिरियड्समध्ये फायदेशीर

आल्याचा वापर स्वयंपाक घरात मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. आल्याने आपल्या भोजनात चव येते. आल्याच्या चहामुळे घसा शेकून घशाला आराम मिळतो. या सर्वांच्या पलीकडे आले आपल्याला अनेक औषधीय फायदे देत असतो. बहुतांश महिलांना माहिती नसेल की, आले पिरियड्समध्येही अत्यंत उपयुक्त आहे. अनेक महिलांना, मुलींना मासिक पाळीदरम्यान पोटात प्रचंड दुखत असते. अशावेळी आल्याचा रस सेवन केल्याने तुम्हाला आराम मिळू शकतो. शिवाय तुमचे इतर शारीरिक प्रॉब्लेम्सही दूर होण्यास मदत होते.

हृदय राहते निरोगी

आल्याच्या रसाचे फायदे तुम्हाला आश्चर्यचकित करणारे आहेत. आल्याचा रस हार्ट प्रॉब्लेम्समध्येसुद्धा उपयुक्त असतो. आल्याचा रस नियमित पिल्याने तुमचे हृदय निरोगी राहते. शिवाय आल्याचा रस नियमित सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे छोट्या-मोठ्या आजरांपासून तुमचा बचाव होतो. सतत आजारी पडण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे आल्याचा रस एकप्रकारे तुमच्यासाठी वरदान ठरेल.

Whats_app_banner