Devil Fruit: या लिंबाचा आकार बघून व्हाल तुम्ही थक्क, सोशल मीडियावर होतेय चर्चा, बघा Viral Video-giant lemon video goes viral on social media ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Devil Fruit: या लिंबाचा आकार बघून व्हाल तुम्ही थक्क, सोशल मीडियावर होतेय चर्चा, बघा Viral Video

Devil Fruit: या लिंबाचा आकार बघून व्हाल तुम्ही थक्क, सोशल मीडियावर होतेय चर्चा, बघा Viral Video

Jan 22, 2024 10:53 AM IST

Viral Video Giant Lemon: विशाल लिंबूचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओला २५ दशलक्षहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

Viral Lemon Video
Viral Lemon Video (@maxiskitchen/ Instagram )

Oddly-Shaped Lemon: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये काय असू शकतं याचा अंदाजही बांधता येत नाही. अनेकदा खाण्याच्या पदार्थांशी रिलेटेड असतात. आपण विचार करू शकत नाही असे प्रयोग या व्हिडीओमध्ये बघायला मिळतात. तर अनेकदा पदार्थ, भांडी, स्वयंपाकाचे तंत्र आणि सर्व्हिंग स्टाईलची झलक आपल्याला मिळते. अलीकडच्या काळात नैसर्गिक पदार्थांची कापणी कशी करतात, वेगवेगळी फळं दाखवणारे व्हिडीओ फार व्हयरल होत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक विशाल, विचित्र आकाराचा लिंबू दिसत आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत २५ दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

बघा व्हायरल व्हिडीओ

@maxiskitchen's या अकाउंट वरून इंस्टाग्रामवर रील पोस्ट करण्यात आले आहे. यामध्ये दिसून येत आहे की व्हिडीओमध्ये एक स्त्री विशाल लिंबू कापताना दिसत आहे. ती लिंबू कापून आतमधून कसे दिसत आहे तेही दाखवत आहे. हे फळ तिच्याच झाडावर जन्माला आले आहे. लिंबाच्या हा व्हिडीओने नेटिझन्सला लोकांना मंत्रमुग्ध केले आहे.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

"जेव्हा रेसिपी म्हणते "एक लिंबू".

"व्वा व्वा! तुम्ही खरोखर छान क्रिएटिव्ह फोटो घ्या आणि ते तुमच्या स्वयंपाकघरात लटकवा! अशा प्रकारे तुम्ही हे लिंबू कायमचे "जतन" करू शकता!"

"तुम्हाला डेव्हील फळ मिळाले आहे."

" मला बघून भीती वाटली"

" या लिंबामुळे मी खूप अस्वस्थ आहे."

"आतून क्रिस्टलसारखे दिसते - सुंदर!"

या व्हायरल व्हिडीओबद्दल तुम्हाला काय वाटत आहे? आम्हाला खाली कमेंट करून कालवा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही.)

Whats_app_banner
विभाग