Holi Skin Care Tips: रंगांचा सण म्हणजे होळी. आज देशभरात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहेत. अनेक दिवस आधीच शाळा, महाविद्यालये, कार्यालये आदी ठिकाणी होळी, रंगपंचमी सेलिब्रेट करण्यात आली. होळीच्या दिवशी रंगानी खेळायला कोणाला आवडत नाही, पण होळीचे रंगही त्वचेसाठी हानिकारक ठरतात. तुम्ही भलेही नॅचरल रंग वापरत असाल, पण कोणी कोणत्या प्रकारचा गुलाल तुम्हाला लावेल हे समजणार नाही. अशा परिस्थितीत केमिकल गुलाल किंवा रंगाने रंगपंचमी खेळल्याने त्वचेवर पुरळ उठू शकते. त्वचा लाल होऊ शकते आणि त्वचेला इजा होण्याचा धोकाही वाढतो. अशावेळी आपण प्री होली स्किन केअर करणे गरजेचे आहे. या सोप्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही तुमच्या त्वचेला मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकता.
होळी खेळताना भरपूरप्रमाणत ऊन असते. सहजच यामुळे सन टॅनिंगही होते. अशा स्थितीत चेहरा आणि शरीरावर सनस्क्रीन लावता येते. वॉटरप्रूफ सनस्क्रीन त्वचेवर लावल्यास त्वचेला रंगांपासूनही संरक्षण मिळते.
पेट्रोलियम जेली हा एक सहज सोपा उपाय आहे. पेट्रोलियम जेली त्वचेवर एक लेअर तयार करते जेणेकरून रंग त्वचेला हानी पोहोचवू शकत नाहीत. त्यामुळे होळी खेळण्यापूर्वी पेट्रोलियम जेलीचा वापर करता येतो.
बदामाचे तेल त्वचेसाठी जसं शरीरासाठी उपयुक्त ठरते तसेच त्याचे स्किनसाठीही उपयुक्त ठरते. रंगपंचमी खेळण्यापूर्वी तुम्ही तुमच्या त्वचेला बदामाचे तेल लावू शकता. बदामाचे तेल हे व्हिटॅमिन ईचा समृद्ध स्रोत आहे. हे तेल त्वचेवर संरक्षणात्मक थर बनवते जेणेकरून रंग त्वचेला हानी पोहोचवू शकत नाहीत.
चेहऱ्यावर टोनर लावायला सुरुवात करावी. टोनर लावल्याने त्वचेची मोठी छिद्रे लहान होऊ लागतात. त्यामुळे त्वचेचे रंग लवकर शोषून घेत नाहीत.
सगळ्यात जुना आणि बेस्ट उपाय म्हणजे खोबरेल तेल. बदामाच्या तेलाप्रमाणे नारळाचे तेलही त्वचेसाठी चांगले असते. होळी खेळण्यापूर्वी खोबरेल तेल भरपूर प्रमाणत लावा. हे तेल त्वचेवर तसेच केसांना लावा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)