मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Remedy for Cold-Cough: सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात? या उपायाने मिळेल आराम

Remedy for Cold-Cough: सर्दी-खोकल्याने त्रस्त आहात? या उपायाने मिळेल आराम

Hiral Shriram Gawande HT Marathi
Sep 18, 2023 07:05 PM IST

Cold and Cough in Monsoon: बदलत्या हवामानात रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने सर्दी-खोकला लगेच होतो. या दिवसांत तुमचे आरोग्य राखायचे असेल तर रोज हळद आणि दालचिनीचा हा चहा प्या.

सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय
सर्दी खोकल्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय (pexels)

Home Remedy To Get Instant Relief From Cough And Cold: बदलत्या हवामानात अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत आहे. याशिवाय घसा खवखवणे, खोकला यांचाही त्रास होतो. सर्दी-खोकला झाल्यास लगेच औषधे घेण्यास तर तज्ञ देखील मनाई करतात. अशा परिस्थितीत आयुर्वेदिक उपाय तुम्हाला मदत करू शकतात, ज्यामुळे या समस्यांपासून आराम मिळतो. सर्दी-खोकल्यापासून आराम मिळण्यासाठी दुधात हळद मिसळून प्या. पण जर तुम्हाला दूध प्यायचे नसेल तर तुम्ही हळदीचा चहामध्ये हा मसाला मिक्स करून पिऊ शकता. ज्याच्या मदतीने सर्दी-खोकला सारख्या समस्यांपासून आराम मिळतो. चला जाणून घ्या हळदीमध्ये कोणता मसाला मिक्स करावा.

ट्रेंडिंग न्यूज

हळदीमध्ये मिक्स करा दालचिनी

हळद आणि दालचिनी मिसळून तयार केलेला चहा हा एक उत्कृष्ट हर्बल टी आहे. जे प्यायल्याने सर्दी आणि खोकल्यापासून आराम मिळतोच. शिवाय वाहणारे नाक बरे होण्यासही मदत होते. वास्तविक हळदीसह दालचिनीचे कंपाउंड श्लेष्मा कमी करण्यास मदत करतात आणि नाकाच्या आतील थरातील सूज कमी करतात, जे वाहत्या नाकापासून आराम देते. यासोबतच हा हर्बल टी पिण्याचे हे फायदे आहेत.

रोगप्रतिकार शक्ती वाढवते

बदलत्या हवामानात हळद आणि दालचिनी मिसळून चहा प्यायल्यास शरीराची प्रतिकार शक्तीही वाढते. जे सर्दी आणि खोकल्यासारखे व्हायरल इन्फेक्शन टाळण्यास मदत करते. इतकंच नाही तर इतर हंगामी संसर्गापासून बचाव करण्यातही ते प्रभावी ठरू शकते.

मेटाबॉलिज्मच्या मदतीने वजन कमी करा

जर तुम्हाला खराब चयापचयमुळे त्रास होत असेल तर दररोज हा हर्बल टी प्या. हे चयापचय प्रणाली दुरुस्त करते. जे नैसर्गिकरित्या वजन कमी करण्यास मदत करते. विशेषत: पोटाजवळ जमा होणारी चरबी या हर्बल चहाने कमी होते.

कोलेस्ट्रॉल कमी करा

जर शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल, तर या केवळ हळद किंवा दालचिनीचा चहा पिण्याऐवजी हे दोन्ही मिक्स करून प्यायलेल्या चहाने जास्त परिणाम होतो. हळद आणि दालचिनी मिसळून चहा प्यायल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते. कारण ते रक्तवाहिन्या देखील स्वच्छ करते.

 

मधुमेह आणि डोकेदुखीवर परिणाम

मधुमेहाच्या रुग्णांनी सकाळी हळद आणि दालचिनीचा हर्बल टी प्यायल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते. मायग्रेनमुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून सुद्धा आराम मिळतो.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel