Gauri Special Recipe: गणेश चतुर्थीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. दरम्यान आज घरोघरी गौराईचे आगमन होणार आहे. गौरी म्हणजे एक सुहासिनी असते. गणेशोत्सवात या चार दिवस ती माहेरी येते. माहेरी आलेल्या लेकीचे सर्व हट्ट पुरविले जातात. त्याचप्रमाणे गौराईच्या आगमनानंतर घरोघरी त्यांच्या आवडीचे विविध पदार्थ नैवेद्यासाठी ठेवले जातात. यामध्ये ज्वारीच्या आंबीलचा आवर्जून समावेश असतो. कारण ज्वारीची आंबील गौराईची फार आवडती असल्याचे म्हटले जाते. परंतु अनेक स्त्रियांना पारंपरिक पद्धतीने आंबील बनवता येत नाही. त्यामुळेच आज आपण ज्वारीच्या आंबीलची अगदी सोपी रेसिपी पाहणार आहोत.
- १ वाटी ज्वारी
-१ वाटी ताक
-२-३ हिरव्या मिरच्या
-४-५ काळी मिरी
-५-६ कढीपत्ता
-१ इंच आले चिरून
-१/४ टीस्पून जिरे
-१/४ टीस्पून मोहरी
-७-८ खोबऱ्याचे तुकडे
-१ चिमूटभर हिंग
-चवीनुसार मीठ
-१ टीस्पून तूप
-१/४ टीस्पून हळद पावडर
-२ टेबलस्पून शेंगदाणे कूट
-सर्वप्रथम ज्वारी स्वच्छ करून ४-५ तास पाण्यात भिजत ठेवा.
-आता ते पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्यात ताक घालून ७-८ तास झाकून ठेवा . आणि हिरव्या मिरच्या कापून, काळी मिरी बारीक करून ठेवा.
-कढईत तूप गरम करून त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, खोबरे, आले, हळद आणि काळी मिरी पावडर घालून भाजून घ्या.
-आता त्यात वाटलेले ज्वारी आणि ताक घालून मिक्स करा, झाकून ठेवा आणि चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचे कूट घालून सुमारे १० ते १२ मिनिटे शिजवा. आता तुमची आंबील तयार आहे.