How to make Garlic Naan: जगभरात अनेक प्रकारचे पदार्थ आहेत. प्रत्येक देशाची काही खासियतही असते. आपल्या भारत देशात तर नानाविध प्रकारचे व्यंजन आहेत. प्रत्येक राज्याच्या वेगेवगेळ्या डिशेस आहेत. खाद्यप्रेमी तर आवर्जून नवनवीन पदार्थ खात असतात. आपल्या भारतीय रेसिपी एवढ्या टेस्टी असतात की त्याला जगभरात पसंत केले जाते. अशीच एक रेसिपी आहे ज्याने जगातील टॉप १० रेसिपीमध्ये आपले स्थान बनवले आहे. या रेसिपीचे नाव गार्लिक नान. भारतातील गार्लिक (लसूण) नानचा जगातील टॉप १० रेसिपीमध्ये समावेश करण्यात आला आहे. टेस्ट अॅटलस या ऑनलाइन फूड डिरेक्टरीने ही यादी प्रसिद्ध केली आहे.तुम्हालाही डिश आवडत असेल तर तुम्ही तंदूरशिवाय ही डिश घरी बनवू शकता. कसं ते जाणून घ्या.
पीठ - १.५ कप (किंवा १ कप मैदा आणि १/२ कप गव्हाचे पीठ)
इंस्टंट ड्राई यीस्ट - १/२ टीस्पून
दही - १ टेबलस्पून
दूध - १/३ कप
साखर - १/२ टीस्पून
तेल - १ टेबलस्पून
कोमट पाणी - १/२ कप
लसूण (बारीक चिरून) - २ टेस्पून
कोथिंबीर (बारीक चिरलेली) – ३ चमचे
बटर - सर्व्हिंगसाठी
प्रथम एका भांड्यात इंस्टंट ड्राई यीस्ट घ्या आणि त्यात साखर घाला. नंतर त्यात १/२ कप कोमट पाणी घाला. आता हे मिश्रण नीट ढवळून घ्या. हे मिश्रण १५ मिनिटे झाकून ठेवा. या मिश्रणात फोम दिसला तर समजा की यीस्ट सक्रिय झाले आहे. लक्षात घ्या जर असे झाले नाही तर यीस्ट सक्रिय नाही किंवा आपण खूप गरम पाणी वापरले आहे. फोम नसल्यास, यीस्टचे मिश्रण पुन्हा तयार करा. आता एका मोठ्या भांड्यात दीड कप मैदा चाळून घ्या आणि त्यात एक चमचा दही, तेल, मीठ घाला. आता त्यात आधी तयार केलेले यीस्टचे मिश्रण घाला. आता चपातीच्या पिठाप्रमाणे मऊ मळून घ्या. मऊ पिठासाठी आवश्यक असल्यास थोडेसे पाणी देखील वापरू शकता.
आता कणिकेला लावून ओल्या कापडाने झाकून ठेवा. साधारण एक ते दीड तास थोड्या उबदार ठिकाणी या कणेकला ठेवा. यानंतर तुम्हाला पीठ फुगलेले दिसेल. आता पीठ मऊ होण्यासाठी पुन्हा एकदा मळून घ्या. आता पिठाचे गोळे बनवा आणि नंतर कापडाने झाकून अर्धा तास बाजूला ठेवा. आता एक गोळा घ्या, त्यावर पीठ लावा आणि लांबीच्या दिशेने अंडाकृती आकारात लाटून घ्या. त्यावर थोडा चिरलेला लसूण आणि चिरलेली कोथिंबीर घाला. नंतर हळूहळू दाबत हलकेसे लाटून घ्या. आता नान फिरवून त्यावर हाताने किंवा ब्रशच्या मदतीने पाणी लावून ते ओले करा. आता जाणून घेऊयात तंदूरशिवाय नान कसा भाजायचा ते.
> सर्व प्रथम नान तयार करून घ्या.
> आता गॅस चालू करा आणि कुकर बाहेर काढून गॅसवर उलटा ठेवा.
> कुकर गरम झाल्यावर तंदूरवर जसे नान बनवतात त्याच पद्धतीने कुकरला आतून नान चिकटवा.
> कुकर तंदूर सारखा काम करतो.
संबंधित बातम्या