Benefits of Garlic: औषधीय आहे लसूण! पुरुषांच्या समस्या दूर करण्यापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत आहेत फायदेच-फायदे-garlic health benefits range from increasing male stamina to keeping the heart healthy ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Benefits of Garlic: औषधीय आहे लसूण! पुरुषांच्या समस्या दूर करण्यापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत आहेत फायदेच-फायदे

Benefits of Garlic: औषधीय आहे लसूण! पुरुषांच्या समस्या दूर करण्यापासून हृदयाच्या आरोग्यापर्यंत आहेत फायदेच-फायदे

Aug 14, 2024 11:19 AM IST

Benefits of Garlic: लसूण चव वाढवण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आपल्या आहारात याचा समावेश केल्यास रक्तदाब कमी होण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

लसूण खाण्याचे फायदे
लसूण खाण्याचे फायदे

Benefits of Garlic: लसूण हा भारतीय स्वयंपाकात वापरला जाणारा एक लोकप्रिय मसाला आहे. त्याच्या सौम्य तिखट चव आणि सुगंधामुळे, ते अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. साधारणपणे लोक त्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी करतात. मात्र, चव वाढवण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. आपल्या आहारात याचा समावेश केल्यास रक्तदाब कमी होण्यास, कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. शिवाय लसणाच्या नियमित सेवनाने पुरुषांच्या अनेक समस्यासुद्धा दूर होतात. आज आपण लसूण खाण्याचे विविध फायदे बघणार आहोत.

जवळपास सर्वच घरांमध्ये लसूण भाज्या किंवा चटणीमध्ये वापरले जाते. लसणाची तिखट, चटपटीत चटणीसुद्धा केली जाते. अनेकांना आमटीमध्ये लसणाचा तडका दिल्याशिवाय चवच येत नाही. परंतु अनेकांना माहिती नसेल की, सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्याने आरोग्यला अनेक फायदे होतात. जर तुम्हाला अजूनही लसणाच्या फायद्यांविषयी माहिती नसेल, तर ही माहिती खास तुमच्यासाठी आहे. नियमित सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन पाकळ्या खाण्याने तुमच्या आरोग्याला चमत्कारिक फायदे मिळू शकतात.

लसणाचे विविध फायदे-

हृदयाचे आरोग्य सुधारणे-

लसूण हा खाण्याची जितकी चव वाढवतो. तितकाच तो आरोग्यालाही फायदे देतो. लसूण दररोज खाल्ल्याने रक्तदाब कमी होऊन, कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊन रक्तवाहिन्या जाम होण्यापासून बचावतात. आणि हृदयाचे आरोग्य उत्तम राहते. यामुळेच याच्या सेवनाने हृदयरोग आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.

शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास उपयुक्त-

लसणात असलेले सल्फर संयुगे शरीरातील जड धातूंचे निर्जंतुकीकरण करण्यास मदत करतात. लसूण यकृतचे कार्य सुरळीत करण्यास मदत करते आणि शरीरातून विषारी पदार्थ काढून टाकण्यासही मदत करते. ज्यामुळे आपल्या संपूर्ण आरोग्यास चालना मिळते. आरोग्य उत्तम राहते.

पुरुषांचे आरोग्य सुधारते-

लसूण आपल्या आरोग्याला अनेक फायदे देतो. विशेषकरून लसूण पुरुषांना जास्त फायदेशीर आहे. लसूण हा पदार्थ अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-फंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यात लोह, फायबर, जस्त, तांबे, कार्बोहायड्रेट्स आणि कॅल्शियम यांसारखे अनेक पोषक घटक आढळतात. कच्चा लसूण प्रत्येकासाठी फायदेशीर आहे. परंतु पुरुषांच्या ताकदीसाठी ते खूप प्रभावी आहे. पुरुषांमधील इरेक्टाइल डिसफंक्शनची समस्या दूर करण्यासाठी हे प्रभावी सिद्ध होऊ शकते. कारण लसणामध्ये ॲलिसिन नावाचा पदार्थ असतो, जे रक्तपेशींचा विस्तार करून रक्तप्रवाह वाढवते. लसणाचे नियमित सेवन केल्याने पुरुषांचा स्टॅमिना वाढतो. त्यामुळेच डॉक्टर पुरुषांनाही नियमित लसूण खाण्याचा सल्ला देतात.

तोंडाचे आरोग्य सुधारणे-

लसणामध्ये शक्तिशाली अँटीमाइक्रोबियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. अशा परिस्थितीत, कच्चा लसूण चघळल्याने बॅक्टेरिया, विषाणू आणि बुरशीसह रोगजनकांशी लढण्यास मदत होते. ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होतो आणि तुमच्या तोंडाचे आरोग्यदेखील सुधारते. तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्याही नाहीशी होते.

 

(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )

 

 

विभाग