Benefits of rubbing garlic on feet: लसूण केवळ जेवणाची चवच वाढवत नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. लोक लसूण वेगवेगळ्या प्रकारे वापरतात. काही लोक लसूण तुपात तळून खातात तर काहीजण चटणी करून खातात. पण तुम्हाला माहित आहे का की, पायांच्या तळव्यावर कच्च्या लसणाच्या पाकळ्या चोळल्यास त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो. आज या लेखात आपण तळव्यांना लसूण चोळण्याचे फायदे जाणून घेणार आहोत…
दर दोन दिवसांनी पायाच्या तळव्यावर लसूण चोळल्याने सर्दी-खोकल्यापासून आराम मिळेल. सर्दी-खोकला होत असल्यास पायाच्या तळव्यावर लसूण चोळा. याच्या मदतीने तुम्ही इतर हंगामी आजार टाळू शकता.
लसूण तळव्यांना चोळल्याने मानसिक आणि शारीरिक ताण कमी होतो. जर तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास होत असेल तर लसूण तळव्यांना चोळायला सुरुवात करा.
जर तुम्हाला थकवा वाटत असेल तर पायाच्या तळव्यावर लसूण चोळायला सुरुवात करा. पायाच्या तळव्यावर लसूण चोळल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि थकवा कमी होतो.
लसूण तळव्यांना चोळल्याने रक्तातील उष्णता वाढते, त्यामुळे शरीरातील उष्णता वाढते.
तुमचे पाय थंड असल्यास, पायाच्या तळव्यावर लसूण चोळल्याने उबदारपणा मिळेल. जर तुम्ही थंड ठिकाणी गेला असाल तर पायाच्या तळव्यावर लसूण चोळा
पायाच्या तळव्यावर लसूण चोळल्यास शरीरात रक्ताभिसरण वाढेल.
(या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेल असा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )