How To Plant Green Cardamom Plants: जर तुम्हालाही बागकामाची आवड असेल, तर तुमच्या घरात आणि बागेत अशा काही झाडांनाही स्थान देता येईल जे खूप उपयुक्त आहेत. आम्ही वेलचीबद्दल बोलत आहोत, जी तुम्ही घरच्या घरी सहज वाढवू शकता. हे रोप फार मोठे नाही, म्हणून ते वाढवण्यासाठी कुंडी किंवा एखादे भांडे देखील वापरले जाऊ शकते. आज आपण लहान वेलचीची लागवड करण्याच्या प्रक्रियेबद्दल बोलणार आहोत. आपण अनेकदा गोड किंवा चमचमीत अन्न पदार्थांमध्ये किंवा माउथ फ्रेशनर म्हणून छोटी वेलची वापरतो. परंतु अनेकदा वेलची प्रचंड महागल्याने आपण घेणे टाळतो किंवा अगदी कमी प्रमाणात घेतो. परंतु आता असं करायची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी वेलचीचे रोप लावण्याची प्रक्रिया सांगणार आहोत.
काही लोक बाजारातून वेलचीचे रोप विकत घेतात तर काही त्याच्या बियापासून ते वाढवतात. मात्र, किराणा दुकानात मिळणारे बियाणे कोरडे असल्याने रोप वाढवता येत नाही. जर तुम्हाला बियाणे वापरून वनस्पती वाढवायची असेल तर तुम्हाला नवीन बियाणे विकत घ्यावे लागेल. जर तुम्हाला बियाण्यांपासून एखादे रोप वाढवायचे असेल, तर तुम्ही रोपवाटिका किंवा ऑनलाइन बियाणे खरेदी करू शकता, परंतु ऑनलाइन खरेदी करताना त्याची गुणवत्ता चांगली असेल याची खात्री करून घ्या.
जर तुम्हाला बाजारातून बियाणे मिळाले तर तुम्हाला एका भांड्यात रोप लावणे सोपे होईल. बरेच लोक बियाणे हवाबंद डब्यात भरतात आणि रात्रभर भिजत ठेवतात. यानंतर ते कुंडीत रोपे वाढवण्यासाठी वापरले जाते. पण जर तुम्ही पहिल्यांदा अशी रोपे लावत असाल तर बाजारातून बिया आणा आणि एक चमचा पाण्यात भिजवून ठेवा. आता एका भांड्यात लाल आणि काळी माती मिसळा. जर तुमच्याकडे लाल माती नसेल तर तुम्ही शेण आणि कोको पीट वापरू शकता. या गोष्टी नीट मिसळा. या वेळी, माती स्वच्छ आहे आणि त्यात कोणतेही कीटक नाहीत हे लक्षात ठेवा. कुंडीमधील मातीवर हलकेसे पाणी शिंपडा आणि नंतर बिया टाका. आता वरती थोडी माती आणि कोको पीट मिसळा, नंतर पुन्हा पाणी शिंपडा.
बियाणे लावल्यानंतर मातीतून रोपाची उगवण होण्यास ४ ते ६ दिवस लागतात. जेव्हा त्या रोपाला पालवी फुटते तेव्हा त्याच्याशी छेडछाड करू नका, तर सकाळ संध्याकाळ मर्यादित प्रमाणात पाण्याची फवारणी करत रहा. बियाणे अंकुरित होऊन बाहेर येईपर्यंत विशेष काळजी घ्यावी लागेल. एक महिन्यानंतर वेलचीचे रोप चांगले वर दिसू लागते.
दररोज सकाळी २ किंवा ३ तास सूर्यप्रकाशात ठेवा. जेव्हा बिया कुंडीत उगवतात आणि वनस्पती म्हणून वाढू लागतात, तेव्हा हे करावे लागते. अजून बिया असतील तर बाहेर सावलीत ठेवा. सुरुवातीला शेणाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा वापर कुंडीत खत म्हणून करू नये. जेव्हा रोप थोडेसे वाढते तेव्हा खत म्हणून घरगुती गोष्टी वापरा. उन्हाळ्यात सकाळ संध्याकाळ नियमित पाणी द्यावे लागते. त्याच वेळी, लक्षात ठेवा की बियाण्यापासून वेलची लागवड करणे खूप कठीण आहे. म्हणून विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वेलची वाढवण्यासाठी मध्यम आकाराचे भांडे घ्या, जे खूप मोठे किंवा खूप लहान नाही. आता जमिनीत बोटाच्या आकाराचे छिद्र करा आणि नंतर बिया टाका. यानंतर काही दिवस थांबा.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)