मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला बाप्पाला अर्पण करा पान गुलकंदचे मोदक, ही आहे रेसिपी

Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला बाप्पाला अर्पण करा पान गुलकंदचे मोदक, ही आहे रेसिपी

Sep 17, 2023 04:34 PM IST

Ganpati Special Bhog Recipe: गणेश चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. तुम्हालाही गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी या खास दिवशी त्यांचा आवडता प्रसाद बनवायचा असेल तर हे पान गुलकंदचे मोदक बनवा.

पान गुलकंद मोदक
पान गुलकंद मोदक

Paan Gulkand Modak Recipe: असे मानले जातेकी गणपतीचा सर्वात आवडता नैवेद्य म्हणजे मोदक आहे. हा नैवेद्य अर्पण केल्याशिवाय त्यांची कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. या खास दिवशी तुम्हालाही गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी त्यांचा आवडते पदार्थ नैवेद्यासाठी बनवायचे असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. मोदकांची ही अनोखी आणि चविष्ट रेसिपी म्हणजे पान गुलकंद मोदक कसे बनवायचे ते जाणून घ्या.

पान गुलकंद मोदक बनवण्यासाठी साहित्य

मोदकच्या फिलिंगसाठी

- ७-८ चमचे गुलकंद

ट्रेंडिंग न्यूज

- १ टेबलस्पून ड्राय फ्रूट्स पावडर

- १/२ टीस्पून बडीशेप पावडर

- २ टेबलस्पून टूटी फ्रुटी

मोदकाचे कव्हरिंग बनवण्यासाठी

- २ कप खोबऱ्याचा चुरा किंवा किसलेले नारळ

- १ कप कंडेन्स्ड मिल्क

- ८ विड्याची पाने

- २ चमचे तूप

- हिरवा रंग

पान गुलकंद मोदक बनवण्याची पद्धत

पान गुलकंद मोदक बनवण्यासाठी प्रथम कंडेन्स्ड मिल्कमध्ये ४ विड्याची पाने फेटून घ्या जोपर्यंत हे दोन्ही नीट एकजीव होत नाही. उरलेली ४ विड्याची पाने बारीक चिरून त्यात घाला आणि चांगले मिक्स करा. आता एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात किसलेले नारळ किंवा बाजारात मिळणारे खोबऱ्याची पावडर घाला आणि सतत ढवळत राहा. हे साधारण २-३ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. आता पॅनमध्ये पानाचे मिश्रण घालून चांगले मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात हिरवा फूड कलर टाकू शकता. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅसवरून काढून थंड होण्यासाठी ठेवा.

यानंतर मोदकचे सारण म्हणजे फिलिंग तयार करण्यासाठी गुलकंद, ड्रायफ्रुट्स पावडर, बडीशेप आणि तुटी फ्रुटी चांगले मिक्स करा. तळहातावर थोडं तूप लावा. पानाचे मिश्रण घ्या आणि मोदकाच्या साच्यात घाला. आता गुलकंदचे मिश्रण मधोमध भरा आणि नीट सर्व बाजूने बंद करा. सर्व मोदक त्याच पद्धतीने बनवा.

WhatsApp channel