Ganeshotsav Special: गणेश मंदिरांमध्ये का प्रसिद्ध आहे सिद्धिविनायक मंदिर? तुम्हाला माहीत आहेत 'या' गोष्टी?-ganeshotsav special why siddhivinayak temple of mumbai is very famous know these facts ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ganeshotsav Special: गणेश मंदिरांमध्ये का प्रसिद्ध आहे सिद्धिविनायक मंदिर? तुम्हाला माहीत आहेत 'या' गोष्टी?

Ganeshotsav Special: गणेश मंदिरांमध्ये का प्रसिद्ध आहे सिद्धिविनायक मंदिर? तुम्हाला माहीत आहेत 'या' गोष्टी?

Sep 12, 2024 09:55 PM IST

Siddhivinayak Temple of Mumbai: मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे प्रसिद्ध गणेश मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात सर्व सेलिब्रेटी येतात. चला जाणून घेऊया हे सिद्धिविनायक मंदिर इतके प्रसिद्ध का आहे

ganeshotsav special मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर का प्रसिद्ध आहे
ganeshotsav special मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर का प्रसिद्ध आहे (Shutterstock )

Facts about Siddhivinayak Temple: सर्व गणेश मंदिरांमध्ये सिद्धिविनायक मंदिर हे सर्वाधिक चर्चेत असलेले मंदिर आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सेलिब्रिटीही येथे भेट देण्यासाठी येतात. हे मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून भाविक मोठ्या संख्येने येथे येतात. गणेशोत्सवाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी येथे मोठी गर्दी होत असते. पण हे मंदिर का प्रसिद्ध आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही तर येथे जाणून घ्या

शेतकरी महिलेची होती ही इच्छा

हे मंदिर याच्या बांधकाम कथेसाठी प्रसिद्ध आहे. गणपती बाप्पाचे सिद्धिविनायक मंदिर १९ नोव्हेंबर १८०१ रोजी लक्ष्मण विठू पाटील नावाच्या स्थानिक ठेकेदाराने बांधले. या मंदिराच्या उभारणीसाठी एका शेतकरी महिलेने पैसे दिले होते. असे म्हटले जाते की या महिलेला मुले नव्हती आणि म्हणून तिने मंदिराच्या बांधकामासाठी मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. या मंदिरात जो कोणी पूर्ण श्रद्धेने आणि भक्ती भावाने येईल, गणपती बाप्पाने त्या व्यक्तीला आशीर्वाद द्यावा, जेणेकरून ती स्त्री निपुत्रिक राहणार नाही, अशी तिची इच्छा होती.

येथे पूर्ण होतात मनोकामना

टीव्ही आणि बी-टाऊन इंडस्ट्रीतील सर्व स्टार्स आपला चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी येथे दर्शनासाठी येतात. अशा तऱ्हेने येथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. येथे मागितली जाणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होते, असे मानले जाते. बाप्पाच्या दर्शनानेच गणपती भक्तांचा सर्वात मोठा त्रास दूर होतो, असे सांगितले जाते. त्यामुळेच अनेकदा बॉलिवूड स्टार्स आपल्या यशासाठी येथे दर्शनासाठी येतात.

रिद्धी आणि सिद्धीसोबत विराजमान आहेत बाप्पा

रिद्धी आणि सिद्धीसोबत सिंहासनावर विराजमान असलेल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीसाठीही हे मंदिर प्रसिद्ध आहे. सिद्धिविनायक मंदिरात गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे. गणेशाची ही मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. ही मूर्ती अडीच फूट उंच आणि दोन फूट रुंद आहे. या मंदिरात त्यांच्या दोन्ही पत्नी रिद्धी आणि सिद्धी यांच्यासह गणपती विराजमान आहेत.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner