Halwa Recipe: रवा आणि बेसन नव्हे तर यंदा बनवा रताळ्याचा शिरा, खूप टेस्टी आहे रेसिपी-ganeshotsav special how to make sweet potato sheera or halwa recipe ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Halwa Recipe: रवा आणि बेसन नव्हे तर यंदा बनवा रताळ्याचा शिरा, खूप टेस्टी आहे रेसिपी

Halwa Recipe: रवा आणि बेसन नव्हे तर यंदा बनवा रताळ्याचा शिरा, खूप टेस्टी आहे रेसिपी

Sep 13, 2024 10:26 PM IST

Ganeshotsav Special Recipe: नेहमीचा रवा आणि बेसनाचा शिरा बनवून कंटाळा आला असेल तर यावेळी रताळ्याचा शिरा ट्राय करा. ही रेसिपी खूप टेस्टी आहे आणि झटपट तयार होते.

ganeshotsav special- रताळ्याचा शिरा
ganeshotsav special- रताळ्याचा शिरा (freepik)

Sweet Potato Sheera or Halwa Recipe: हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाची सुरुवात ७ सप्टेंबरपासून झाली. असे मानले जाते की समृद्धी आणि बुद्धीची देवता भगवान गणेशाची पूजा केल्याने भक्ताला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. या दिवसांमध्ये लोक बाप्पाला विविध वस्तूंचा प्रसाद अर्पण करतात. मोदक, लाडू सोबतच अनेक ठिकाणी प्रसादात शिरा किंवा हलवा दिला जातो. पण तोच नेहमीचा रवा, बेसनाचा शिरा बनवून कंटाळा आला असेल तर यंदा रताळ्याचा शिरा ट्राय करा. ही रेसिपी चविष्ट आहे आणि झटपट तयार आहे. चला तर मग जाणून घेऊया रताळा शिरा कसा बनवायचा.

रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी साहित्य

- ५ मध्यम आकाराचे रताळे

- १ वाटी गूळ

- १ कप दूध

- ४ चमचे तूप

- ५ वेलचीची पूड

- १ चिमूटभर केशर

- १० ते १२ काजू चिरलेले

- ड्राय फ्रूट्स

रताळ्याचा शिरा बनवण्याची पद्धत

रताळ्याचा शिरा बनवण्यासाठी प्रथम रताळे उकळून थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. यानंतर त्याची साल काढून चांगले मॅश करावे. आता एका कढईत तूप घालून त्यात काजू आणि केशर घालून हलके तळल्यानंतर मॅश केलेल्या रताळ्यात घालावेत. आता दुसऱ्या कढईत पाणी गरम करण्यासाठी ठेवा. या पाण्यात वेलची पूड आणि गूळ घालून पाक तयार करा. रताळ्याचा रंग बदलत आहे असे दिसू लागल्यावर त्यात १ कप दूध व गूळाचा पाक घालून शिरा नीट ढवळून सर्व काही नीट मिक्स करावे. शिरा बनल्यावर त्यावर ड्राय फ्रूट्स घालून सजवून थोडा वेळ झाकून ठेवा. बाप्पाच्या प्रसादासाठी रताळ्याचा शिरा तयार आहे.

Whats_app_banner