Ganeshotsav Look: बाप्पाच्या स्वागतासाठी खास 'महाराष्ट्रीय लूक' मध्ये व्हा तयार! नऊवारीपासून मेकअपसाठी घ्या टिप्स-ganeshotsav fashion tips to get ready in traditional maharashtrian look for ganesh chaturthi ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ganeshotsav Look: बाप्पाच्या स्वागतासाठी खास 'महाराष्ट्रीय लूक' मध्ये व्हा तयार! नऊवारीपासून मेकअपसाठी घ्या टिप्स

Ganeshotsav Look: बाप्पाच्या स्वागतासाठी खास 'महाराष्ट्रीय लूक' मध्ये व्हा तयार! नऊवारीपासून मेकअपसाठी घ्या टिप्स

Sep 02, 2024 09:04 PM IST

Ganesh Chaturthi Fashion Tips: गणेश चतुर्थीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. सर्वत्र जोमाने तयारी सुरु आहे. तुम्हाला बाप्पाच्या स्वागतासाठी पारंपारिक महाराष्ट्रीयन लूक करायचा असेल तर या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त आहेत.

ganesh chaturthi: गणेशोत्सवासाठी पारंपारिक महाराष्ट्रीय लूक
ganesh chaturthi: गणेशोत्सवासाठी पारंपारिक महाराष्ट्रीय लूक (Instagram)

Traditional Maharashtrian Look for Ganesh Chaturthi: वर्षभराच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर बाप्पाच्या आगमनाची प्रतीक्षा संपली आहे. यावर्षी ७ सप्टेंबरला बाप्पाच्या स्वागतासाठी लोकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. देशभरात गणेशोत्सव साजरा होत असला तरी त्याचा खरा रंग महाराष्ट्रात पाहायला मिळतो. प्रत्येक गल्ली परिसरात उत्साहात बाप्पाचे स्वागत करताना दिसत आहेत. घरोघरी सुद्धा गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. फक्त डेकोरेशनच नाही तर लोक यादिवशी खास तयार सुद्धा होतात. तुम्हाला यंदाच्या गणेशोत्सवासाठी पारंपारिक महाराष्ट्रीय लूक करायचा असेल तर या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त आहेत. नऊवारी नेसण्यापासून मेकअप आणि हेअरस्टाईल टिप्स येथे पाहा, जे तुम्हाला परफेक्ट लूक देतील.

अशी नेसा नऊवारी

महाराष्ट्रीयन लूकमध्ये नऊवारीला अनन्य साधारण महत्त्व आहे किंवा त्याशिवाय हा लूक अपूर्ण आहे असे म्हणता येते. नेहमीच्या साडीपेक्षा नऊवारी नेसण्याची स्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. नऊवारी साडी नेसण्यासाठी सर्वप्रथम साडी लांबीच्या बाजूने समान भागांत विभागून घ्या. आता कमरेचा अर्धा भाग डावीकडे आणि अर्धा उजव्या बाजूला आणून पुढे आणा. आता साडीचा थोडासा भाग दोन्ही बाजूंनी धरून व्यवस्थित बांधा. उजव्या बाजूच्या पायांच्या मधून साडी काढा, मग त्यापासून प्लीट्स बनवताना साडीचा पदर बनवून डाव्या खांद्यावर लावा. आता डाव्या बाजूची साडी पायाच्या मधून काढा. यानंतर रुंदीच्या बाजूने अशा प्रकारे प्लीट्स बनवा की साडीची बॉर्डर वरच्या बाजूला येईल. आता ते नाभीसमोर खोचा. यानंतर साडीचा अतिरिक्त भागाच्या प्लीट्स करून मागच्या बाजूने टग करा. तुमची नऊवारी नेसून रेडी आहे.

गोल्ड ज्वेलरीने मिळेल पारंपारिक लूक

पारंपारिक महाराष्ट्रीयन लुकसाठी सोन्याचे किंवा गोल्डन दागिने परिधान करणे चांगले. नऊवारी सोबत ते अधिक सुंदर दिसतात. तुम्ही गोल्डन झुमके आणि नेकपीस घालू शकता. जर तुमच्याकडे लेयर्ड गोल्ड लूक असलेला नेकपीस असेल तर तो सुद्धा घालता येईल. पारंपारिक महाराष्ट्रीय लूक पूर्ण करण्यासाठी नाकात मोत्यांची नथ घालायला विसरू नका. जर तुमच्याकडे कमरपट्टा असेल तर तेही घाला. यामुळे तुमचा ओव्हरऑल लूक आणखी एन्हांस होईल.

कपाळावर लावा चंद्रकोर

कपाळावार टिकलीशिवाय तुमचा लूक अपूर्ण आहे. स्त्रिया कपाळावर गोल, चौकोनी, अंडाकृती, लांब अशा वेगवेगळ्या डिझाइन आणि आकाराच्या टिकल्या लावतात. पण चंद्रकोर आकाराची टिकली तुमचे सौंदर्य आणखी वाढवते. तुम्ही तुमच्या आवडीच्या आकार आणि डिझाईनची चंद्रकोर लावू शकता. शिवाय तुम्ही कुंकूने सुद्धा कपाळावर चंद्रकोर रेखाटू शकता.

गजरा लावायला विसरू नका

नऊवारी साडीसोबत केसांचा अंबाडा परफेक्ट आहे. तुम्ही फ्रंटला केस तुमच्या आवडीनुसार स्टाईल करून मागे बन बनवू शकता. पण याला गजरा लावायला विसरू नका. त्याशिवाय तुमचा लूक अपूर्ण दिसेल. हल्ली बाजारात फ्लोरल बन पिनही उपलब्ध आहेत, तुम्ही हे ट्राय करू शकता.