Ganpati Makhar Decoration Ideas: वर्षभराच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर गणेश चतुर्थीचा पवित्र सण येणार आहे. अशा परिस्थितीत तुम्हीही मोठ्या उत्साहात बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू केली असेल. घराच्या सजावटीपासून मंडप सजावटीपर्यंत आपल्या बाप्पाचे स्वागत मोठ्या थाटामाटात व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. बाप्पा जेव्हा घरात येतील तेव्हा सर्व लोक पाहतच राहिले पाहिजे, असे प्रत्येकाला वाटत असते. तुम्हाला सुद्धा बाप्पाचे दिमाखात स्वागत करायचे असेल तर त्यांचा मखर सुद्धा तेवढाच सुंदर सजवणे आवश्यक आहे. मखर डेकोरेशनच्या बाबतीत तुम्ही बॉलिवूड स्टार्सकडून काही टिप्स घेऊ शकता. दरवर्षी मुंबईच्या या स्टार्सच्या घरी बाप्पा येतो तेव्हा प्रत्येकजण बाप्पाच्या मंडपाच्या सुंदर सजावटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतो. चला तर मग आज आपण सुद्धा बाप्पाच्या स्वागतासाठी काही टिप्स जाणून घेऊया.
जेव्हा गोष्ट सजावटीची येते तेव्हा फुलांना तोड नसतो. आणि गणेश चतुर्थीसारख्या धार्मिक सणांचा विचार केला तर फुलांपेक्षा चांगली सजावट काहीच असू शकत नाही. बॉलीवूड स्टार्सही आपल्या बाप्पाचा मखर भरपूर फुलांच्या साहाय्याने सजवतात. आपण आपल्या बाप्पाचा मंडप रंगीबेरंगी फुलांच्या माळांनी सजवू शकता. याशिवाय फुलांचे बंच आणि बुके बनवून सुद्धा सजावट करता येते. जर तुम्हाला तुमच्या मंडपाला थोडा व्हायब्रंट लूक द्यायचा असेल तर झेंडू, गुलाब अशा फुलांचा वापर करा. दुसरीकडे, थोडे सूदिंग आणि शांत वातावरण हवे असेल तर हलक्या पेस्टल शेड्सची फुले वापरा.
हल्ली लोकांमध्ये निसर्गाविषयी जागरुकता वाढली आहे. त्यामुळेच बॉलिवूड स्टार्सना इको फ्रेंडली डेकोरेशन करायला आवडते. यासाठी तुम्ही केळीच्या पानांचा अतिशय उत्तम वापर करू शकता. केळीच्या पानांची योग्य पद्धतीने मांडणी करून बाप्पाच्या मंडपाचा बॅकग्राउंड बनवता येतो. याशिवाय तुम्ही ते वेगळे अरेंज करून मंडपाची बाउंड्री देखील तयार करू शकता. यासाठी तुम्ही विड्याची पानं किंवा आंब्याची पानं वापरू शकता.
मखर किंवा मंडपाच्या सजावटीसाठी लाइटिंगकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रकाशयोजना योग्य नसेल तर सजावट कितीही चांगली केली तरी ती नेहमीच फिकी दिसते. अशा वेळी तुम्ही बॉलिवूड स्टार्सकडून ही टिप घेऊ शकता की लाइटिंग नेहमीच उत्तम ठेवावी. यासाठी तुम्ही दिवाळीची लाइटिंग काढून बाप्पाचा मखर सजवण्यासाठी त्याचा वापर करू शकता. याशिवाय रंगीबेरंगी एलईडी लाइट आणि आर्टिफिशियल दिवे तुम्ही केव्हाही वापरू शकता. हे अतिशय सुंदर दिसतात.