Interesting Story of Moti Dungri Ganesh Temple of Jaipur: गणेश चतुर्थीच्या काळात सर्व गणेश मंदिरे सुंदर सजवली जातात. या दिवसांमध्ये लोक वेगवेगळ्या मंदिरांमध्ये जाऊन देवाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात. जयपूरचे मोती डुंगरी गणेश मंदिर हे भारतातील अनेक मंदिरांपैकी एक आहे. मोती डुंगरी गणेश मंदिर राजस्थानमधील जयपूर मधील एका छोट्या टेकडीच्या माथ्यावर आहे आणि एका सुंदर राजवाड्याने वेढलेले आहे.
दगडी कोरीव कामापासून बनवलेले हे मंदिर संगमरवरावरील उत्कृष्ट जाळीदारच्या कामासाठीही ओळखले जाते. संगमरवरी दगडांवर कोरलेल्या अनेक पौराणिक प्रतिमा कला रसिकांना आकर्षित करतील. गणेश चतुर्थीच्या काळात मंदिराची सुंदर सजावट केली जाते. या मंदिराची कथा अतिशय रंजक आहे. चला तर मग गणेशोत्सवाच्या खास निमित्ताने जाणून घ्या या मंदिराशी संबंधित रंजक गोष्टी
अनेक रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, एके दिवशी मेवाडचा राजा प्रदीर्घ प्रवास करून आपल्या राजवाड्यात परत जात होता आणि त्याच्याकडे बैलगाडीत गणेशाची मूर्ती होती. राजाला मंदिर बांधायचे होते आणि त्याने ठरवले होते की जिथे गाडी पहिल्यांदा थांबेल तिथेच मंदिर बांधले जाईल. असे म्हटले जाते की राजाची गाडी मोती डुंगरी डोंगराखाली थांबली आणि याच ठिकाणी आज गणेश मंदिर आहे. सध्या जयपूरच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये या मंदिराचा समावेश करण्यात आला आहे.
बुधवार हा दिवस गणपतीच्या दर्शनासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्ही बुधवारी गणेश मंदिरात जात असाल तर या दिवशी तुम्हाला एक खास जत्रा पाहायला मिळणार आहे. या दिवशी मंदिरात खूप सुंदर रोषणाई केली जाते. काही लोक मंदिरात कीर्तन करतात.
मंदिर परिसराभोवती बांधलेला राजवाडा एखाद्या स्कॉटिश महाल सारखा दिसतो. मात्र, ही वैयक्तिक मालमत्ता असल्याने या वाड्यात जाण्याची परवानगी नाही.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या