Prasad or Bhog for Lord Ganesh: अखेर बाप्पाच्या स्वागताची वेळ जवळ आली आहे. मोठे मंडळच नाही तर प्रत्येक घरी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. आपल्या घरी बाप्पाचे आगमन झाले की त्याचे मोठ्या थाटामाटात स्वागत व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. यात कोणतीही कमतरता राहू नये म्हणून प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. त्यापैकीच एक गोष्ट म्हणजे बाप्पाचा प्रसाद. गणेश चतुर्थीला बाप्पा आपल्या घरी येतात तेव्हा त्यांना त्यांच्या आवडत्या गोष्टींचा प्रसाद अर्पण करावा असे म्हटले जाते. चला तर मग जाणून घेऊया बाप्पाच्या आवडत्या ५ गोष्टींबद्दल जे तुम्ही बाप्पााला प्रसाद म्हणून अर्पण करू शकता.
गणपती बाप्पाला मोदक किती आवडतात हे कुणाला ठाऊक नाही. अशा परिस्थितीत गणेश चतुर्थीनिमित्त प्रसाद म्हणून मोदक अर्पण करणे बेस्ट आहे. पारंपारिक पद्धतीने नारळ आणि गुळापासून मोदक बनवले जातात. पण हल्ली अनेक प्रकारचे मोदकही बाजारात आले आहेत. हे गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण केले जातात. ही मिठाई खूप चवदार असते. मोदकचा आस्वाद घेऊन बाप्पा खूप प्रसन्न होतात, अशी धार्मिक मान्यता आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाला तिळाचे लाडू ही अर्पण केले जातात. बाप्पाला हे लाडू सुद्धा खूप आवडतात. गणेश चतुर्थीच्या खास निमित्ताने तीळ आणि गूळ मिकळून त्याचे लाडू खास पद्धतीने तयार केले जातात. हे खायला खूप टेस्टी असतात.
गणेश चतुर्थीला बाप्पाला खीर सुद्धा अर्पण केली जाते. तांदूळ, दूध, साखर आणि ड्रायफ्रूट्स पासून बनवलेली गोड खीर गपणतीला खूप आवडते. असे मानले जाते की गणपतीला खीर अर्पण केल्याने बाप्पा आनंदी होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.
गणेश चतुर्थीनिमित्त बाप्पाला ताज्या फळांचा रसही अर्पण केला जातो. आंबा, द्राक्षे, डाळिंब, सफरचंद अशा ताज्या फळांचा रस गणेशाला अर्पण केल्याने ते खूप आनंदी होतात. ताज्या फळांचा रस हा गणपतीचा पारंपारिक प्रसाद आहे. जर तुम्हाला ज्यूस बनवणे शक्य नसेल तर केळी, सफरचंद, द्राक्षे, डाळिंब अशी फळे गणेशाला प्रसाद म्हणून अर्पण करू शकता. फळ किंवा फळांच्या रसाचा प्रसाद ताजेपणा आणि चांगल्या आरोग्याचे प्रतीक आहे.
पान सुपारी म्हणजे जे तांबूल म्हणून देखील ओळखे जाते हे पूजेत खूप शुभ मानले जाते. विड्याच्या पानांपासून तुम्ही घरीच तांबूल बनवू शकता. गणेश चतुर्थीनिमित्त गणपती बाप्पाला त्यांचा आवडता तांबूलचा प्रसाद अर्पण करा.