मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Makeup Tips: ब्लशरशिवाय अपूर्ण आहे तुमचा मेकअप लूक, गणेशोत्सवात तयार होताना उपयोगी पडतील या टिप्स

Makeup Tips: ब्लशरशिवाय अपूर्ण आहे तुमचा मेकअप लूक, गणेशोत्सवात तयार होताना उपयोगी पडतील या टिप्स

Sep 19, 2023 11:31 AM IST

Ganesh Chaturthi Makeup Tips: बाप्पाच्या आगमनासाठी तुम्ही छान तयार होत असाल तर मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घ्या. ब्लशर लावण्यासाठी हे सोपे टिप्स उपयोगी पडतील.

ब्लशर लावण्यासाठी मेकअप टिप्स
ब्लशर लावण्यासाठी मेकअप टिप्स (unsplash)

Simple Tips To Apply Blusher: १९ सप्टेंबर पासून उत्साहात गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. १० दिवसांच्या या उत्सवात अनेक लोक घरी आपल्या लाडक्या बाप्पाला आणतात आणि त्यांची मनोभावे पूजा करतात. यावेळी महिला, मुली साज श्रृंगार करून पूजा करतात. तर काही सार्वजनिक मंडळांमध्ये सुद्धा महिलांचा सहभाग असतो. तुम्हालाही यंदाच्या गणेश चतुर्थीला वेगळे आणि सुंदर दिसायचे असेल तर ब्लशर लावताना काही चुका करणे टाळा. ब्लशर चुकीच्या पद्धतीने लावल्याने तुमचे वय तुमच्या वास्तविक वयापेक्षा मोठे दिसू शकते, हे लक्षात ठेवा. अशा परिस्थितीत ब्लशर लावताना काय काळजी घ्यावी, ते कसे लावावे हे येथे पाहा.

तीन प्रकारचे असतात ब्लशर

ब्लशरचे तीन प्रकार आहेत. पावडर ब्लश, जे पावडर स्वरूपात असते आणि ऑइली स्किनसाठी योग्य आहे. दुसरे म्हणजे लिक्विड ब्लश. हा ब्लश ट्यूबमध्ये येतो आणि थोडा चिकट असतो. हे ड्राय स्किनवर लावू शकता. पण ते लावताना त्याच्या ब्लेंडिंगवर लक्ष दिले पाहिजे. तिसरा ब्लश म्हणजे केक किंवा क्रीम बेस असते. ते कॉम्बिनेशन स्किनसाठी चांगले आहे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते.

ट्रेंडिंग न्यूज

ब्लशर लावण्यासाठी टिप्स

रोझी ग्लो

चांगल्या पद्धतीने लावलेले ब्लशर तुमच्या निस्तेज त्वचेवर ताजे आणि गुलाबी चमक आणू शकते. यासाठी ब्लशर लावताना त्यात थोडासा गोल्डन शिमर टाकल्यास तुमचे फीचर्सचा समतोल राखला जाईल.

योग्य कव्हरेज

चेहऱ्याला योग्य कव्हरेज देण्यासाठी तुमच्यासाठी क्रीम ब्लशर, मूस ब्लशर पावडर, लिक्विड किंवा जेल ब्लशर लावण्याची योग्य पद्धत जाणून घेणे खूप महत्वाचे आहे.

गोल चेहरा

जर तुमचा चेहरा गोल असेल तर तुम्ही गालावर व्ही शेपमध्ये ब्लशर लावा. तसेच हनुवटीवर हलके ब्लशर लावा.

ब्लशरचा रंग

ब्लशरचा रंग निवडताना दोन गोष्टींकडे लक्ष द्या. प्रथम तुमच्या ड्रेसचा रंग काय आहे आणि दुसरा तुमच्या त्वचेचा रंग काय आहे. यानुसार ब्लशरचा शेड निवडा.

पावडर ब्लशर

ब्लशर तुम्हाला बोल्ड लुक देते, कारण ते मध्यम ते हेवी कव्हरेज देते. आपल्या गालांना आकार देण्यासाठी शेड आणि कॉन्टूर करण्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. ते लावण्यासाठी डोम शेप ब्लशर ब्रशला ब्लशरवर ठेवा आणि गोल फिरवा. नंतर स्माइल करा आणि हलके स्ट्रोकमध्ये गालाच्या अॅपलवर लावा. ते वरच्या बाजूने स्ट्रोक देत लावा. ब्रशने हे नीट ब्लेंड करा.

जेल ब्लशर

तुम्ही गाल आणि ओठ दोन्हीसाठी जेल ब्लशर वापरू शकता. लक्षात ठेवा क्रीम जेलचे टेक्सचर लिक्विडपेक्षा वेगळे आहे. हे दीर्घकाळ टिकणारे आणि नैसर्गिक मॅट स्टेन लुक देते.

 

कसे लावावे ब्लशर

ब्लशर लावण्यापूर्वी प्रथम फाउंडेशन बेस तयार करून चेहऱ्यावर ब्लश लावावा. ब्लशसाठी चांगले ब्लेंडिंग ब्रशने ब्लशर घ्या आणि गालावर लावण्यापूर्वी ते हातावर डॅब केल्यानंतर गालावर लावा. यामुळे जास्तीचे ब्लश हातावर राहील आणि गालांवर ब्लेंड करणे सोपे होईल. ब्लशर लावल्यानंतर ते ब्रशने चांगले ब्लेंड करायला विसरू नका. ब्लशर नेहमी कानापासून गालाकडे आणा. चिकबोनच्या खाली लावत कानाच्या दिशेने ब्लेंड करा.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel