Modak Recipe: गणेश चतुर्थीला बनवा टेस्टी केसर मावा मोदक, प्रसादासाठी बेस्ट आहे रेसिपी-ganesh chaturthi 2024 special how to make kesar mawa modak recipe at home ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Modak Recipe: गणेश चतुर्थीला बनवा टेस्टी केसर मावा मोदक, प्रसादासाठी बेस्ट आहे रेसिपी

Modak Recipe: गणेश चतुर्थीला बनवा टेस्टी केसर मावा मोदक, प्रसादासाठी बेस्ट आहे रेसिपी

Sep 06, 2024 07:42 PM IST

Ganesh Chaturthi Special: तुम्हाला घरी बाप्पासाठी मोदक बनवायचे असतील तर ही रेसिपी ट्राय करू शकता. कमी वेळेत केसर मावा मोदक बनून तयार होतील.

ganesh chaturthi- केसर मावा मोदक
ganesh chaturthi- केसर मावा मोदक (unsplash)

Kesar Mawa Modak Recipe: अवघ्या एक दिवसावर आलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. बहुतांश घरी डेकोरेशन शेवटच्या टप्प्यात आले असून, महिला देखील विविध पदार्थ बनवण्यात व्यस्त आहे. गणेश चतुर्थीला गणपतीचे आवडते मोदक आवर्जून बनवले जातात. तुम्हाला सुद्धा बाप्पाच्या आगमनाला मोदक बनवायचे असतील यावेळी केसर मावा मोदकची रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी खूप सोपी आहे आणि झटपट तयार होते. चला तर मग जाणून घ्या कसे बनवायचे केसर मावा मोदक.

केसर मावा मोदक बनवण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे-

- खवा

- साखर

- पिस्ता

- वेलची पावडर

- केशर

- दूध

केसर मावा मोदक बनवण्याची पद्धत

हे बनवण्यासाठी एका भांड्यात दूध आणि साखर एकत्र करून बाजूला ठेवा. आता एका नॉन-स्टिक पॅन किंवा कढईमध्ये खवा ३ ते ४ मिनिटे भाजून घ्या. ते चिकटू नये म्हणून मध्ये मध्ये ढवळत राहा. भाजल्यावर त्यात केशर दूध घालून मध्यम आचेवर २ मिनिटे राहू द्या. माव्याचे मिश्रण नीट मिक्स करून प्लेटमध्ये काढून घ्या. आता हे मिश्रण थंड होऊ द्या. थंड झाल्यावर हाताने मॅश करा. त्यात बारीक केलेली साखर, वेलची पावडर आणि पिस्ता घाला. नीट मिक्स केल्यानंतर मोदक बनवण्याचा साचा घ्या आणि त्याला तूप लावून ग्रीस करा. आता त्यात तयार केलेले मावाचे मिश्रण भरून नीट दाबून घ्या. तुमचे केसर मावा मोदक तयार आहे. तुम्ही प्रत्येक मोदकवर एक केशरची काडी लावून गार्निश करू शकता.

Whats_app_banner