Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवआधी शिका पारंपरिक साटोऱ्या, एकदम जुनी आहे रेसिपी-ganesh chaturthi 2024 recipe for making satori for ganeshotsav ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवआधी शिका पारंपरिक साटोऱ्या, एकदम जुनी आहे रेसिपी

Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवआधी शिका पारंपरिक साटोऱ्या, एकदम जुनी आहे रेसिपी

Sep 01, 2024 10:02 AM IST

satori for Ganeshotsav: बाप्पाला अर्पण करण्यासाठी घराघरात मोदक नक्कीच बनवले जातात. पण त्याचबरोबर इतरही काही पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. त्यापैकीच एक म्हणजे साटोरी होय.

गणेशोत्सवला साटोरी बनवण्याची रेसिपी
गणेशोत्सवला साटोरी बनवण्याची रेसिपी (pixabay)

Ganesh Chaturthi Recipe:  गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाला अर्पण करण्यासाठी घराघरात मोदक नक्कीच बनवले जातात. पण त्याचबरोबर इतरही काही पदार्थांचा आस्वाद घेतला जातो. त्यापैकीच एक म्हणजे साटोरी होय. महाराष्ट्रात गणपतीला अर्पण करण्याबरोबरच लोकांनाही हा पदार्थ खूप आवडतो. ही एक प्रकारची गोड पुरी आहे. ती बनवण्यासाठी खव्याचा यांचा वापर केला जातो. त्यामुळे बाप्पाच्या नैवेद्यासाठी हा पदार्थ नक्की ट्राय करा. परंतु अनेकांना हा पदार्थ अद्याप जमत नाही. टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला या पदार्थाची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

 

साटोरी बनवण्यासाठी साहित्य-

२ कप खवा

१ चमचा खसखस

१ चमचा वेलची पावडर

१ कप साखर किंवा आरोग्यदायी पर्यायासाठी खजूर

१/२ कप तूप

१/२ कप मैदा

१/२ कप रवा

किसलेला खोबरं

मिल्क पावडर

मनुका

तेलाचे मोहन

साटोरी बनवण्याची रेसिपी-

सर्वप्रथम अर्धा कप रवा आणि मैदा मिक्स करून घ्या. अर्धा कप तूप, चिमूटभर मीठ घाला. पीठ तुपात चिकट होईपर्यंत मिक्स करा.

आता हे पीठ मळण्यासाठी दूध घ्या. पीठ मळून अर्धा तास तसेच राहू द्या.

सारण बनवण्यासाठी कढईत खवा गरम करून घ्या. जोपर्यंत खवा बाजूने तूप सोडण्यास सुरवात करत नाही तोपर्यंत भाजत राहा. आता गॅसवरून काढून थंड होऊ द्या.

त्याच कढईत थोडे तूप घालून खसखस, वेलची पावडर वेगळे भाजून थंड होऊ द्या.

खसखस मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करा.

आता खव्यात साखर, वेलची पावडर, जायफळ पावडर, खसखस पावडर आणि ड्रायफ्रूट्स पावडर मिसळून सारण तयार करा.

मैद्याचे लहान लहान गोळे तयार करा आणि त्यात सारण भरा.

फक्त या भरलेल्या गोळ्यांची जाड पोळी करून कढईत देशी तुपात तळून घ्या.

साटोरी देवाला नैवेद्य अर्पण करण्यास तयार आहे. तळताना सतोरी फुगवावी जेणेकरून ते अधिक दिवस साठवता येईल.