Chia Seeds Viral Face Mask: लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. सण म्हटलं की विविध गोष्टी येतात. महिलांसाठी तर सणासुदीचा काळ फारच खास असतो. याकाळात नवनवीन साड्या, पारंपरिक ड्रेस परिधान करण्यापासून आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यापर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो. सण येताच महिला तयारीला लागतात. सणासुदीत आपण सर्वात जास्त उठून दिसावे अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. त्यासाठी ती विविध उपायही करत असतात. गणेशोत्सवमध्ये आगमन सोहळा, आरती, पूजा आणि गौरी पूजन अशा विविध कार्यक्रमांना महिला नटूनथटून तयार होतात. यासाठी अनेकजण आधी पार्लरला जाऊन येतात. परंतु काही महिलांना कामाच्या व्यापातून संधीच मिळत नाही. त्यामुळे अशा महिलांना घरच्या घरी आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवता येणार आहे. आज आम्ही तुम्हाला अशा फेस पॅकबाबत सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला पार्लरला जायची गरजच पडणार नाही.
आजच्या व्यस्त जीवनात, आपल्या आरोग्याची आणि चेहऱ्याची काळजी घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. या गोष्टींकडे जास्त काळ दुर्लक्ष केल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. जेव्हा तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी घेणे थांबवतो तेव्हा तुमचा चेहरा निस्तेज आणि थकलेला दिसू शकतो. आजचा लेख अशा लोकांसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे ज्यांना त्यांच्या चेहऱ्यावरील हरवलेली चमक परत आणायची आहे. आणि यंदाच्या ग्णाइशोत्सवात सर्वात आकर्षक आणि सुंदर दिसायचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशा एका फेस मास्कबद्दल सांगणार आहोत जो आजकाल इंटरनेटवर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
जर तुम्हालाही सुंदर आणि चमकदार त्वचा हवी असेल, तर तुम्ही त्वचेला डिटॉक्स करणे फार महत्वाचे आहे. तुमची त्वचा सुंदर ठेवण्यासाठी, तुम्ही मॉइश्चरायझ करणे आणि ते हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करणेदेखील खूप महत्वाचे आहे. आज आपण ज्या फेस मास्कबद्दल बोलत आहोत त्या इन्स्टंट ग्लो फेस मास्कच्या मदतीने तुम्ही या सर्व गोष्टी साध्य करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया हा फेस मास्क तुम्हाला कसा मदत करू शकतो आणि तो तयार करण्याची नेमकी पद्धत काय आहे.
गणेशोत्सवात तुम्हालाही इन्स्टंट ग्लो हवा असेल तर, तुम्हाला हा झटपट ग्लो फेस मास्क तयार करावा लागेल. यासाठी तुम्हाला चिया सीड्स, दूध आणि मधाची गरज पडेल. हा फेस मास्क तयार करण्यासाठी तुम्हाला दोन चमचे चिया सीड्स दुधात भिजवाव्या लागतील. लक्षात ठेवा की हे दूध थंड असावे. चिया सीड्स पूर्णपणे कोरडे होईपर्यंत किंवा शोषले जाईपर्यंत तुम्ही ते दुधात भिजवून ठेवू शकता.
नंतर त्यात मध घालून हा मास्क चेहऱ्यावर लावावा. आता हा मास्क चेहऱ्यावर ३० ते ४० मिनिटे राहू द्या. मास्क वाळल्यानंतर तुम्हाला तुमचा चेहरा हलक्या हातांनी स्क्रब करावा लागेल आणि कापसाच्या मदतीने तुमचा चेहरा देखील स्वच्छ करावा लागेल. साफ केल्यानंतर चेहरा थंड पाण्याने नीट धुवून घ्या.
(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)